तुळशी वृंदावन हे आपल्या घराची शोभा वाढवत असते. तसेच वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणून प्रत्येक हिंदु धर्म मानणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर तुळस असतेच. कारण तुळस घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते. तुळशीचे आयुर्वेदिक बरेच गुणधर्म आहेत.
जर आपण माता तुळशीजवळ काही गोष्टी ठेवल्या तर आपल्या घरात सुख आणि वैभव नक्की येते. सर्वांत पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे स्वस्तिक होय. कारण हे हिंदु ध-र्माचे प्रतीक मानले जाते. ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी सर्व देवीदेवतांचा वास असतो.
जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टींची वाढ होते तेव्हा तुळस सुखते किंवा वाळते. अश्या वेळी तुम्ही या तुळशीजवळ स्वस्तिक काढा. त्याने नकारात्मक विचार नाहीसे होतात. स्वस्तिक काढताना कुंकूचा वापर करा तेव्हा ओम नमो भगवते वसुदेवाय हा मंत्र जप करा.
पैसा म्हणजे सर्व काही नाही कारण आजकाल आपण पाहतो की काही लोकांना मुले नाहीत त्यांनी त्या स्त्रीने तुळशी जवळ बसुन भगवत गीता वाचावी आणि तुळशी पुढे संततीची इच्छा व्यक्त करावी. जेव्हा तुम्ही तुळशीचे रोपटे आणाल तेव्हा मनोभावे हात जोडुन म्हणा की हे माता तुळशी तुला आम्ही आमच्या घरी आमंत्रीत करत आहोत.
माता तुळशीचे रोप शक्यतो गुरुवारी लावावे. अनेक लोक आपल्या तुळशी वृंदावनात शिवलिं-गाची पूजा करतात पण त्यामुळे माता तुळशी नाराज होते. त्यामुळे त्याच्या ऐवजी शाळीग्रामची पूजा तुळशी वृंदावनात करावी कारण तेच तिचे हिंदू धर्मानुसार पती आहेत. दिवाळी नंतर हा शाळीग्रामचा दगड तुलसी विवाहासाठी स्थापन करावा.
त्याने आपल्या जीवनात आनंद आपोआप येतो. काही जणांना त णा व असतो त्याने आपली झोप पुर्ण होत नाही त्यासाठी आपण रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात तुळशीची पाने टाकुन झाकुन ठेवावे. सकाळी उठल्यावर हे पाणी पिण्यास विसरू नये.
झोपे बरोबर तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि तिसरी वस्तु म्हणजे रोज संध्याकाळी तुळशी वृंदावनात गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात. याचबरोबर काही नियम ही आहेत, जसे की रोज सकाळी तुळशीस जल अर्पण करावे आणि सायंकाळी करु नये. तुळशी वृंदावनाजवळ साफ सफाई करत रहा आणि अधार्मिक गोष्टी तुळशी जवळ ठेऊ नका.
वरील सर्व गोष्टी किंवा उपाय केल्यास तुम्हाला माता तुळशी आणि या जगाचे पालनकर्ता श्री भगवान विष्णू यांची कृपा तुमच्या घरावर होईल, तसेच काही नियम ही पाळल्याने तुमच्या घरी धनाचे अनेक स्रोत येतील आणि सुख समृद्धी नांदेल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.