मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
का कुठेही ब्रह्मदेवाचे मंदिर नाही? ब्रम्हदेवाची पूजा आपण का करत नाही..ब्रम्हदेवाची पत्नी कोण होती..जाणून घ्या यामागील सत्य..

हिंदु ध-र्माच्या शास्त्र अनुसार या सृष्टीची निर्मिती ही 3 देवांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रम्हा, भगवान विष्णू आणि महेश यांनी केली आहे. याच्या व्यतिरिक्त फक्त देवाचे देव महादेव यांचा ज न्म आणि मृत्यू कोणालाही माहीत नाही. महादेव हे अनंत आहेत. सृष्टी निर्माण केलेले भगवान ब्रम्हादेव यांचे या जगात कुठेही मंदिर नाही. हे एक मोठे सत्य आहे.

जगातील प्रत्येक प्राणी ब्रह्माने निर्माण केलेला आहे. पण आपण कधी हा विचार केला आहे का की ब्रह्मा, या विश्वाचा निर्माता भगवान ब्रह्मदेवाचे पूजन का केले जात नाही. संपूर्ण जगात ब्रह्माची अपवाद असे एक मंदिरे आहे, ते म्हणजे राजस्थानमधील पुष्करमधील ब्रह्मा मंदिर सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध आहे.

कारण या ब्रह्मदेवाकडून वेदग्रंथाचा प्रसार झाला. त्यांच्या 4 चेहऱ्यामध्ये 4 वेद आहेत. पण खूप कमी लोक त्याची भक्ती करत असतात. एकदा ब्रह्मदेवाला एक यज्ञ करायचा होता, हा यज्ञ लोकांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी होता. तेव्हा त्याने आपले एक कमळ पृथ्वीवर सोडले की जे यज्ञ करण्यासाठी योग्य जागा निश्चित करेल आणि ते कमळ जिथे पडले ते म्हणजे आजचे राजस्थान आणि तिथे एक तलाव निर्माण झाला.

तेच ठिकाण यज्ञासाठी योग्य निश्चित केले. पण यज्ञाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री वेळेवर जाऊ शकली नाही. पण या यज्ञात पूर्ण करण्यासाठी एका स्त्रीची आवश्यकता होती आणि यज्ञाची वेळ निघून जात होती. हा यज्ञ वेळेवर करणे आवश्यक होते. अशावेळी ब्रह्मदेवाने एका स्थानिक स्त्रीबरोबर लग्न करून ते दोघे यज्ञाला बसले. मात्र यज्ञ सुरू झाल्यावर काही वेळेतच ब्रह्मदेवाची ध र्म पत्नी सावित्री तिथे पोहचली.

मग तिला आपल्या ठिकाणी परस्त्रीला पाहून खूप राग आला आणि तिने रागाच्या भरात ब्रह्मदेवांना तुमची या भूतलावर कधीच पुजा केली जाणार नाही असा शाप दिला आणि इथे कोणतीच व्यक्ती ब्रह्मदेवांची पुजा करताना आठवण काढणार नाही. हा तिचा राग पाहून सर्व देवीदेवता भयभीत झाले आणि सर्वांनी देवी सावित्रीला विनंती केली की तिने ब्रह्मदेवारील शाप परत घ्यावा,

देवी सावित्रीने राग शांत झाल्यावर सांगितले की फक्त या पुजेच्या ठिकाणी ब्रम्हादेवाची पुजा केली जाईल आणि इथे त्यांचे एक मंदिर होईल. म्हणून फक्त राजस्थान मधील पुष्कर या ठिकाणी ब्रम्हदेवांची पूजा केली जाते आणि इथे त्यांचे मंदिर देखील आहे. देवी सावित्रीचा राग शांत झाल्यावर माता सावित्री शेजारच्या एका पर्वतावर जाऊन तपश्चर्येला बसली आणि आजच्या काळात ही देवी सावित्री या पर्वतात स्थित आहे आणि आपल्या भक्तांचे कल्याण करत आहे. असा उल्लेख अनेक हिंदु ध र्म ग्रंथात आहे.

तिथे जाऊन विवाहित महिला आपल्या समृद्धी संसार सुखाची प्रार्थना करतात. ब्रम्हादेवाचे पुष्कर येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि राजस्थानला जाणारे सर्व हिंदू लोक या मंदिराचे आणि तेथील तलावाचे दर्शन घेऊन जातात. या कारणामुळे शापामुळे ब्रम्हदेवाचे मंदिर कोठेही नाही. तसेच त्यानं कुठेच व कुठल्याच पुजेत मान दिला जात नाही व पूजन केले जात नाही.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.