का कुणी कैलास पर्वत आजतागायत चढू शकले नाही ? खरच तिथे महादेवाचे वास्तव्य आहे का..जाणून घ्या रहस्य आणि शास्त्रज्ञांचा अनुभव..

कैलास पर्वताला हिंदू ध-र्मामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. कारण कैलास पर्वतावर देवाधिदेव भगवान शंकर यांचे वास्तव असल्याची मान्यता आहे. या पर्वताचा आकार साक्षात शिवलिं-ग स्वरूप समान भासतो, इथून अमरनाथ ला जाताना भक्तांना अतिशय धन्य वाटते. इथली प्रसन्न हवा जीवन धन्य झाल्याचं भासवते व शरीर, आत्मा अतिशय तृप्त होतो. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे.

जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी सर केलं आहे. याची उंची ८८४८ इतकी आहे. पण कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे.

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती तिथे जाऊ शकत नाही. असे मानले जाते की, कैलाश पर्वतावर थोडं वर चढल्यावर व्यक्ती दिशाहीन होते. दिशा कळत नसताना चढाई करणे म-रणाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळेच आजपर्यंत कुणी कैलास पर्वतावर चढू शकलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं. कारण इथे श-रीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. त्यासोबतच कैलास पर्वतावर फार जास्त रेडिओएक्टिवही आहे.

रशियातील एक गिर्यारोहक सरगे सिस्टीयाकोव यांनी सांगितले की, ‘जेव्हा मी कैलास पर्वताच्याजवळ गेलो तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडत होतं. मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाहीत. पण मला अचानक कमजोरी वाटू लागली आणि माझ्या मनात विचार आला की, मी इथे थांबू नये.

त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, माझं मन हलकं होत गेलं’.कैलास पर्वतावर चढाई करण्याचा शेवटचा प्रयत्न जवळपास १८ वर्षांआधी म्हणजे २००१ मध्ये केला गेला होता. तेव्हा चीनने स्पेनच्या एका टीमला कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

कारण भारत आणि तिबेटसहीत जगभरातील लोकांचं मत आहे की, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये. म्हणून येथील सरकारने त्यानंतर कैलास पर्वतावर जाण्यासाठी अनुमती दिली नाही. कैलास पर्वतावर शिव नसून साक्षात कैलास पर्वतच शिव आहे, याचा आकार पिरॅमिड सारखा असून सर्व पर्वत बर्फाच्छादित आहे व जेव्हा या बर्फावरती सूर्याची सोनेरी किरणे पडतात त्यावेळी हा कैलास पर्वत सुवर्ण असल्याचा आभास होतो. तसेच इथे साक्षात शिव ध्वनी ओम ध्वनी ऐकू येतो, हे साक्षात शिवाचे घर आहे.

आपल्याला याबद्दल काय वाटते खरेच तिथे भगवान महादेवाचे वास्तव्य आहे का. की अजून काही नैसर्गिक शक्ती आहे..आम्हाला कमेंट करून आपले मत नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *