पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी म्हणून राधाचा उल्लेख आढळतो. पण महाभारतात ‘राधा’ च्या नावाचा उल्लेख कुठेच नाही. पद्म पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराणात राधाचा उल्लेख दिला आहे. याशिवाय राधा आणि रुक्मिणी या दोघीही कृष्णांपेक्षा वयाने मोठ्या होत्या.
एका दंतकथेवर आधारित, राधाबद्दल बरेच काही सांगितले जाते. ब्रह्मवैवर्त पुराणातील एका आख्यायिकेनुसार, राधा गोलोकात श्रीकृष्णाबरोबर राहत असताना, तिच्या अनुपस्थितीमध्ये, श्री कृष्ण आपल्या दुसर्या पत्नी वीर्झासमवेत चालत होते, तेव्हा ते पाहून राधा रागाच्या भरात निघून गेली.
ही बाब श्रीकृष्णाचे सेवक आणि मित्र श्रीधामाला योग्य वाटली नाही, त्यामुळे तो राधाला चांगले-वाईट बोलू लागला. त्यामुळे राधाने क्रोधित होऊन, श्रीधामाला पुढच्या जीवनात शंखचूर्ण नावाचा राक्षस होण्याचा शाप दिला. त्यावर त्यानेही राधाला पृथ्वीवर मानवी रूपात ज न्म घेण्यासाठी, 100 वर्षांच्या कृष्ण-विरहाचा शाप दिला.
पद्म पुराणानुसार राधा वृषभानू नावाच्या एका वै श्य गोप्याची कन्या होती. तिच्या आईचे नाव कीर्ती असे होते. तिचे नाव वृषभानू कुमारी पडले. राधाचे वडील वृषभानू बरसाना येथे वास्तव्यास होते. काही विद्वानांच्या मतानुसार राधाजीचा ज न्म यमुनेच्या जवळ असलेल्या रावळ गावात झाला, त्यानंतर तिचे वडील बरसाना येथे वास्तव्यास आले.
बहुतेकांचा विश्वास असे की, राधाजींचा जन्म बरसाना येथे झाला होता. त्याशिवाय ,राजा सुजलचंद्र आणि मानस मुलगी कलावती यांनी 12 वर्षे तप करून ब्रह्मदेवाकडुन राधाला मुलीच्या रूपात प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते. याचा परिणाम म्हणून, द्वापारमध्ये वृषभानू आणि राणी कीर्ती यांचा ज न्म झाला, आणि नंतर दोघेही पती -पत्नी झाले,असे सांगितले जाते.
ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंड 2 च्या 39 अध्यायानुसार, मंत्र 39 आणि 40च्या नुसार, राधा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह रायान नावाच्या एका व्यक्तीसोबत लावून दिला. तसेच ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंडाच्या अध्याय 49 श्लोक 35, 36, 37, 40, 47 च्या अनुसार एका वेगळ्या नात्याने राधा श्रीकृष्णाची मामी पण होती.
कारण त्यांचे लग्न कृष्णाची आई यशोदाचा भाऊ रायाणशी झाल होत. रायाणला रापाण किंवा अयानघोष या नावाने देखील ओळखतात. पूर्व जन्मी राधाचा पती रायाण गोलोकात श्रीकृष्णाचा अंशभूत गोप होता. पुराणानुसार श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीवर कृष्ण पक्षात झाला होता, आणि याच तिथीला शुक्लपक्षात राधाचा जन्म झाला होता.
बरसाना येथे राधाष्टमीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राधाष्टमीचा सण जन्माष्टमीच्या 15 दिवसानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो. राधाराणीचे जगप्रसिद्ध देऊळ बरसाना गावाच्या टेकडीवर आहेत. या गावात राधाराणीला ‘लाडली’ म्हटले जाते. राधाचे प्राचीन देऊळ मध्ययुगातील असून लाल आणि पिवळ्या पाषाणाने बनविले आहेत. 1675 साली राजा वीरसिंह याने हे भव्य देऊळ बनविले होते.