गणेश जयंती: बाप्पांना दुर्वा अर्पण करताना बोला हा मंत्र..बाप्पा करतील पैशाचा वर्षाव..

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो 15 फेब्रुवारी २०२०१ रोजी सोमवारी गणेश जयंती आली आहे. गणेश जयंती म्हणजे प्रथम पूजनीय अशा गणपती बाप्पांचा जन्म दिवस. मित्रांनो या गणेश जयंतीला आपल्या जीवनात जे काही दुख आहे आपल्या ज्या काही समस्या आहेत,
त्या पासून आपण सुटका मिळवून घेवू शकतो. शास्त्रानुसार या शुभ दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर, गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतो. आपल्या जीवनात सुखाचा वर्षाव होईल.
गणपती ही बुद्धीची देवता आहे. आपल्या जीवनात सर्वांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचे हे बुद्धी दाता श्री गणेश करत असतात. म्हणूनच जर आपण पुढील उपाय केले तर आपल्या जीवनात ज्या काही स म स्या असतील तर त्या प्रत्येक स मस्येचे निवारण श्री गणेश करतील.
या शुभ दिवशी श्री गणेशाची आपण घरात पूजा करावी. गणपती बाप्पांना प्रिय अशी लाल जास्वंदाची फुले अर्पण करावीत. या दिवशी गणपतींना तिळाच्या लाडूचा नैवेद्य अवश्य दाखवा.
या दिवशी तिळाचा लाडू बनवण्याची प्रथा आहे. म्हणून या चतुर्थीला तीलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. आता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत.
लक्षात ठेवा या दुर्वा श्री गणेशांच्या पायांवर किंवा अंगावर वाहयच्या नाहीत. तर या दुर्वा आपल्याला श्री गणेशांच्या मस्तकावर वाहयच्या आहेत. मित्रांनो आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की या दुर्वा श्री गणेशांना किती प्रिय आहेत ते.
अशा प्रिय दुर्वा गणरायांना अर्पण केल्या तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दुर्वा अर्पण केल्यानंतर आपल्या मनात जी काय इच्छा आहे त्या गणपती बाप्पांसमोर बोलायच्या आहेत.
आपल्या जीवनातील दुख दूर होण्यासाठी गणपतीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. श्री गणेश तुमची सर्व दुखे दूर करून तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. मित्रांनो हा उपाय आपण गणेश जयंती पासून दररोज करायचा आहे.
जो पर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही, जो पर्यंत तुमच्यावरचे संकट टळत नाही तोपर्यंत हा उपाय चालू ठेवा. मात्र लक्षात ठेवा दुसऱ्यांचे वाईट व्हावे, नुकसान व्हावे अशी भावना अजिबात ठेवू नका.
अशा प्रकारचे वाईट मागणे गणरायाकडे मागू नका. मित्रांनो नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवा. असा हा साधा सोपा उपाय नक्की करून बघा. ज्यांना लवकर परिणाम हवे आहेत अशांनी २१ दुर्वा अर्पण केल्यानंतर,
एक मंत्र म्हणला तर त्याचे खूपच चांगले परिणाम बघायला मिळतात. इदम दुर्वादनम ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा 21 किंवा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. या उपायाने तुमच्यात एवढी सकारत्मकता उ र्जा भरेल की तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी कुशलतेने कराल.
आपल्या घरात सुख समाधन येईल. कोणत्याही प्रकारची पैशाची समस्या घरात राहणार नाही. अशा या शुभ दिवशी आपण वरील उपाय नक्की करून पहा.
आपला देखील गणपती बाप्पांवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये “गणपती बाप्पा मोरया” नक्की लिहा आणि ही माहिती आपल्या प्रियजणांसोबत शेयर करा..
अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..