गणेश जयंती 15 फेब्रुवारी: बाप्पांना अर्पण करा ही वस्तू..सुख समृद्धी मिळून सर्व संकटे क्षणात दूर होतील..बाप्पा करतील धनाचा वर्षाव..

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो पौराणिक मानेतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा ज न्म झाला. गणेश ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर प्रकट झाले तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता.
मित्रांनो भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती हे प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणतेही शुभ कार्य असो ते कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते.
या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असं मानले जाते. मित्रांनो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढच महत्त्व आहे.
गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असे ही म्हणलं जातं. या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये गणेश जयंती १५ फेब्रुवारी सोमवारी या दिवशी आलेली आहे. चतुर्थी तिथी प्रारंभ होईल १५ फेब्रुवारी प्राथक काळी १ वाजून ५८ मिनीटांनी
आणि चतुर्थी तिथी समाप्त होईल १६ फेब्रुवारी पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी. मित्रांनो या दिवशी केली जाणारी श्री गणेशाची पूजा अत्यधिक लाभधायक ठरते. आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकाचे नैवेद्य दाखवला जातो. तर माघ गणेश उसत्वात गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवणाची प्रथा आहे.
यामुळेच माघ गणेश जयंती ही तीळकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. आग्नेय पुराणांमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीळकुंद चतुर्थी व्रताच महत्व सांगण्यात आले आहे. आग्नेय पुराणांमध्ये भाग्य आणि मोकक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थीच्या व्रताच महत्व सांगण्यात आले आहे.
या दिवशी गणेशाची पूजा केल्याने वर्षभर गणपती बाप्पाचा आशिर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घायचे आहे. चौरंगावर श्री गणेशाची स्थापना करायची आहे.
श्री गणेशाला प्रिय असलेल्या जास्वंदीची फुलं, लाल फुलं व दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर श्री गणेश अथर्व शीर्षकाच वाचन करावं. आणि श्री गणेशला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा.
मित्रांनो जर तुमच्या एखाद्या कामात अडचण येत असेल तुमचे एखादे काम पूर्ण होत नसेल ते करताना अनेक अडथळे निर्माण होत असतील. तर यासाठी या दिवशी श्री गणेशा समोर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे.
आणि आपले कार्य पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाना प्रार्थना करायची आहे. मित्रांनो गणपतीच्या आशिर्वादाने आपली सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. मित्रांनो तुम्हीसुध्दा या गणेश जयंतीला श्री गणेशाची मनोभावे आराधना करा.
गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुले व त्यांची आवडते पदार्थ अर्पण करा. श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घ्या ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश होईल आणि तुमच्यावर गणपती बाप्पाची कृपा कायमस्वरूपी राहील.
आपला देखील गणपती बाप्पांवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये “गणपती बाप्पा मोरया” नक्की लिहा आणि ही माहिती आपल्या प्रियजणांसोबत शेयर करा..
अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..