ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर भगवान श्री कृष्ण म्हणतात या 5 कारणांमुळेच मनुष्य जीवनात येते गरिबी. गीता उपदेश करताना श्री कृष्ण म्हणतात मनुष्य जीवनातील सुख, दुख, गरिबी, श्रीमंती या साठी स्वतः मनुष्यच जबाबदार असतो.
वाईट कर्म कराल तर त्याचे वाईटच फळ मिळेल. चांगली कर्म कराल तर चांगली फळ उपभोगायास मिळतील. मनुष्याने कष्ट करावेत. ध’र्माच्या मार्गाने पैसे कमवावेत. धर्माच्या मार्गाने कमावलेला पैसा मनुष्य जीवनात सुख आनंद निर्माण करतो.
याउलट अध’र्माने कमावलेला पैसा मात्र मनुष्य जीवनात दुख, कलह, अशांती निर्माण करतो. मनुष्याचे भाग्य कितीही प्रबळ असुद्या मात्र ही चुकीची घडलेली ५ कार्ये मनुष्याच्या जीवनात गरिबी अवश्य निर्माण करतात. चला तर जाणून घेवूयात ही 5 चुकीची कार्ये कोणती आहेत.
१) नैवद्य अर्पण करण्यापूर्वीच जेवण करणे:- ज्या घरात देवांना नैवद्य अर्पण करण्यापूर्वीच जेवण केले जाते त्या घरात गरिबी येते. त्या घरात दरिद्री कायम वास करते आणि म्हणून प्रत्येकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या निर्मात्यांनी आपल्याला अन्न प्रदान केले आहे त्याला विसरता कामा नये.
घरात सर्वात प्रथम देवपूजा केल्यानंतर आपण देवी देवतांना नैवद्य अर्पण करावा आणि सोबतच या अन्नावर केवळ मनुष्याचा अधिकार नाहीये मनुष्यासोबतच पशु, पक्ष्यांचा प्राण्यांचा देखील अधिकार आहे. देवाला नैवद्य अर्पण केल्यानंतर आपल्या घरातील पहिली पोळी गोमातेसाठी बाजूला काढून ठेवावी.
गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो शिवाय गोमाता आपल्याला दुध देखील देते त्या गोमातेला सुद्धा आपल्या घरातील अन्न अवश्य द्यावे. याप्रमाणेच कुत्र्याला सुद्धा पोळी किंवा भाकरी देण्याची हिंदू ध’र्मात प्रथा परंपरा आहे.
२) दान धर्म:- ज्या घरातील व्यक्ती आपल्या ऐपतीनुसार दान ध’र्म करत नाहीत. त्या व्यक्तींवर माता लक्ष्मी क्रोधीत होते. आपल्याला या निर्मात्याने जे धन दिले आहे त्या पैशाचा सदुपयोग करायचा असेल तर त्यासाठी दान ध’र्म हा योग्य मार्ग मानला जातो.
दान ध’र्म केल्यामुळे आपल्या पैशात प्रचंड वाढ होते. मात्र दान न केलेले धन हे आपल्या जीवनातून सुख शांती हिरावून घेते. आपल्या दारात जर गरजू आला त्याला हाकलून त्याचा अपमान करू नका. आपल्या ऐपतीनुसार दान धर्म अवश्य करा.
३) स्त्रियांचा अपमान:- ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो त्या घरात सुद्धा पैसा टिकत नाही. श्री कृष्ण म्हणतात स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचे रूप आहे. ज्या घरात स्त्रीला मा’रहा’ण होते तिचा अपमान होतो त्या घरात भयंकर पाप कर्म घडतात.
४) घरात म’द्यपान आणि जुगार खेळेने:- ज्या घरातील लोक घरात दररोज मद्यपान आणि जुगार खेळत बसतात यास हिंदू ध’र्मात पाप असेच म्हणतात. यांमुळे आपल्या पुण्यात घट होते. जुगार खेळेणे किंवा मद्यपान करणे यास पैशाचा दुरुपयोग मानला जातो.
ज्या ज्या ठिकाणी पैशाचा दुरुपयोग होतो त्या ठिकाणी लक्ष्मी क्रोधीत होवून निघून जाते. ज्या लोकांना आपल्या पैशात चांगली वाढ करायची असेल तर नेहमी आपल्या पैशाचा सदुपयोग करायला शिका यामुळेच आपल्या पैशात आणखी वाढ होईल.
५) परस्त्री गमन:- परस्त्री गमन हिंदू ध’र्मांत पाप मानले जाते. बाली पासून रावणापर्यंत आणि रामायणापासून ते महाभारतापर्यंत हे दाखले मिळतात की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीने परस्त्रीची अपेक्षा धरली. त्या त्या व्यक्तीचा अंत निश्चित होतो.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.