मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
गुरुवारी करा हे जीवन बदलणारे उपाय..घरात येईल चारही बाजूने धनाचा पाऊस..श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो..

मराठी समुदायच्या या नव्या लेखात आपले स्वागत आहे. मित्रांनो आपण पैसे तर भरपूर कमावतो यासाठी मनापासून प्रयत्न देखील करतो. परंतु कधीकधी आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ आपणास मिळत नाही.

आपल्या मेहनतीच्या मानाने उत्पन्न कमी मिळते आणि बचत तर होतच नाही. यासाठी आज आपण पाहणार आहोत गुरुवारी करण्याचे काही खास उपाय ज्यांच्यामुळे आपल्याला चारी दिशांनी सफलता मिळते.

चला तर जाणून घेवूयात गुरुवारी करण्याच्या या उपायांबद्दल. गुरुवार आठवड्यातील पाचवा दिवस गुरुवारी श्री विष्णूंचे व गुरूंचे पूजन केल्याने आपल्याला लाभ होतात.

गुरुवार हा देवी लक्ष्मीचा देखील वार आहे म्हणून धन प्राप्तीसाठी गुरुवारी केले उपाय हे विशेष फळास येतात दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते.

यामुळे तुमच्या आर्थिक स म स्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल गुरुवार हा देवी लक्ष्मी चा आणि श्रीविष्णूचा आवडता वार आहे व त्यांचा आवडता रंग पिवळा आहे.

म्हणून शक्यतो गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. जर पिवळे कपडे घालने शक्य नसेल पिवळा रुमाल तरी बरोबर असू द्या.

गुरुवारी कोणत्या महत्त्वाच्या कामाबद्दल बाहेर पडायचे असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई आणून त्याचा नैवेद्य विष्णूंना आणि लक्ष्मीला द्यावा त्यानंतर हा प्रसाद खाऊन मगच घराबाहेर पडावे.

यामुळे ते महत्त्वाचे काम नक्कीच यशस्वी होईल जर शक्य असेल तर प्रत्येक गुरुवार विष्णूंच्या मंदिरात जावे व त्यांचे दर्शन घ्यावे श्री विष्णूंना गुरुवारी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावेत.

जर श्री विष्णूचे मंदिर घराच्या आसपास नसेल तर कोणत्याही देवी-देवतांच्या मंदिरामध्ये आपण हे पिवळे फुले अर्पण करू शकता. आपले काम करता करता मनातल्यामनात ओम विष्णूवे नमः या मंत्राचा जप करीत रहावे म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यात भगवंत आपल्याबरोबर असतील.

आपल्या सर्वांनाच धनाची अपेक्षा असते आणि धनाची देवता ही महालक्ष्मी आहे. परंतु आपण जर विष्णूंचे ध्यान व पूजन केले तर श्रीविष्णू आपल्या सोबत असतील व जेथे स्वतः विष्णू असतील तेथे लक्ष्मी असणारच.

मित्रांनो हे छोटे-छोटे उपाय करून आपण आपल्या घरी धनाचा वर्षाव करू शकता. तर या गुरवारी वरील हे उपाय नक्की करून पहा आणि आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.