मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
घरात पैसा खेचून आणण्यासाठी करा मीठाचा हा उपयोग..श्री महालक्ष्मीची होईल कृपा..

नमस्कार मित्रांनो..

आपल्याला माहित आहे कि जेवणाला जसं चव देण्याचं काम मीठ करतं, पण जसे जेवणात मीठ महत्वाचं असतं तसंच ते ज्योतिषशास्त्रामध्येही खूप महत्वाचं मानलं जातं. मीठ हे राहू आणि केतूच्या वाईट प्रभावाला दूर करण्याचे काम करते असे मानले जाते आणि मिठाचा योग्य पद्धतीने वापर झाल्यास आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. चला तर मग आपण पाहूयात मिठाचे आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे आहेत.

आपणास माहित आहे का कि मीठ नकारात्मक उर्जा शोषून घेते आणि घरातील किंवा कार्यालयातील सकारात्मक उर्जेचा यामुळे संचार कायम राहतो. तसेच रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने हातपाय धुतल्यास देखील झोप चांगली लागते. राहू-केतूचा प्रभाव कमी करण्यासही मिठाचा उपयोग होतो.

आठवड्यातून एकदा लहान मुलांना मिठाच्या पाण्याची आंघोळ घालावी, यामुळे त्यांना दृष्ट सुद्धा लागत नाही. पण आज आपण असे काही मिठाचे उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपल्या आयुष्यात पैशांची बरसात होणार आहे. आपल्याला माहित असेल कि मीठ अनेक प्रकारचे असते जसे कि काळे मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य मीठ, तसेच ज्योतिषशास्त्रा मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मनाला जातो.

तसेच मिठाला राहूचे प्रतिक देखील मानले जाते. त्यामुळे जर आपण या मिठाला आपल्या स्वयंपाकघरात स्टीलच्या किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवल्यास तेथे चंद्राची आणि शनीची युती होते. आणि जर असे झाले तर हे आपल्यासाठी खूप घातक सिद्ध होते. मिठाला प्लास्टिकच्या भरणीत देखील ठेवू नये, तर मिठाला फक्त आणि फक्त काचेच्या भरणीतच ठेवावे.

तरच त्याचा वाईट परिणाम जाणवत नाही. तसेच मीठ आपल्या हातून सांडणे देखील अपशकुन समजले जाते. पण जर आपल्या हातून मीठ पडले तर आपल्या ग्रहांची स्थिती बदलते आणि चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात. तसेच स्वयंपाक करताना कधीही मीठ चाखून पाहू नये कारण असे केल्यास आपल्या घरात दारिद्र्य येते. तसेच देवाला जेवण दाखवल्याशिवाय आपण त्याचे सेवन करू नये. तसेच मीठ कोणाच्या हातात देऊ नये यामुळे आपले अनेक चांगले सं बं ध देखील खराब होतात.

चला तर मग आता आपण पहिला उपाय पाहू, जर आपल्या घरात पैशाची कमतरता असेल किंवा सारखी भांडणे होत असतील तर थोडे काळे मीठ घ्या आणि ते मीठ लाल कपड्यात ठेवून ते बांधून घ्या आणि ते बांधलेला कपडा आपल्या मुख्य प्रवेश द्वाराला लावा. त्यामुळे आपल्या घरात येणारी नकरात्मक शक्ती नाहीशी होईल.

तसेच हेच काळे मीठ बांधून जर आपण तिजोरीत ठेवले तर नक्कीच आपल्या पैशात वाढ होते आणि आपल्या घरात सुख समुद्धीचे वातावरण राहील तसेच असे कल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी देखील दूर होतील.

दुसरा उपाय:- आपल्याला माहित असेल कि राहू आणि केतूमुळे वाईट प्रभाव पडतो आणि संकटं ओढावतात असं म्हटलं जातं. मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहूशी निगडीत आहेत. काचेच्या बाऊलमध्ये मीठ भरून ते बाथरूममध्ये ठेवल्यास आपल्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार राहतो. पण हे मीठ थोडे दिवसांनी बदलत राहणं खूप गरजेचं आहे.

तिसरा उपाय:- जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील तर मिठाच्या पाण्याने आपले घर पुसून काढा. वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने घरातील सकारात्मक उर्जा वाढायला मदत होते आणि आपल्या कुटुंबामध्ये प्रेम वाढीस लागते आणि कलह कमी होतात.

तसेच दांपत्यामध्ये वारंवार भांडणं होत असतील तर मिठाचा तुकडा किंवा थोडेसे मीठ हे बेडरूममध्ये ठेवून द्यावे. हे तुकडे किंवा मीठ दर महिन्याला बदला. यामुळे दांपत्यामधील प्रेम वाढीला लागते आणि नाते मजबूत होण्यास मदत होते.

चौथा उपाय:- काचेच्या ग्लासात मिठाचं पाणी भरून ते घराच्या उत्तरे-पूर्वेला ठेवून द्यावे. त्यासाठी आपण लाल रंगाचा बल्ब लावावा किंवा ग्लास हा लाल रंगाचा असला तरी चालेल. तसेच यामधील पाणी संपल्यास ते पुन्हा भरून ठेवावे. यामुळे घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यास मदत होते आणि बाहेर अडकलेले पैसे परत मिळण्यासही मदत होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.