जाणून घ्या कलयुगाचा अंत झाल्यानंतर सतयुग कसे असेल ? बघा या युगामध्ये काय काय घडणार आहे..

मित्रांनो, आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी हिं’दू ध’र्मामध्ये पुराणे लिहून ठेवली आहेत त्यामध्ये युगां बद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. प्रत्येक युगातील महत्वाच्या घटना कथा स्वरुप आपणास वाचावयास मिळतात. शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार एकूण चार युगे आहेत. कृतयुग (सत्ययुग), त्रेतायुग ,द्वापारयुग, कलियुग अशी त्यांची नावे आहेत.
सध्या आपण ज्या युगामध्ये आहोत ते आहे कलियुग. याच्या आधी तीन युगे होऊन गेली आहेत. बऱ्याच जणांना युग म्हणजे काय याची कल्पना नसेल तर युग म्हणजे ठरलेल्या काही वर्षांचा निर्धारित केलेला हजारो वर्षांचा काळ. पुराणांमध्ये कलियुगाबद्दल असं सांगण्यात आले आहे की, या युगाचा काळ हा सर्वात कमी असणार आहे. चला तर जाणून घेऊया याच्याशी निगडीत काही गोष्टी.
वेगवेगळ्या देवतांचा ज’न्म हा वेगवेगळ्या युगांमध्ये झाला असं सांगण्यात आले आहे. प्रभू रामचंद्रांचा ज’न्म त्रेतायुगामध्ये तर श्रीकृष्णांचा ज’न्म हा द्वापारयुगात झाला. सत्ययुगात १००% ध’र्म, सत्य, पुण्य होते ते त्रेतायुगात ७५% झाले आणि द्वापारयुगात ५०% झाले तर कलियुगात फक्त २५% च उरले. कलियुगामध्ये अध’र्म पसरायला सुरुवात झाली आहे,
माणसांनी एकमेकावर विश्वास ठेवणे बंद केले आहे, त्यांचा वेद आणि शास्त्रे यांच्यावरील विश्वास उडाला आहे. आपलीच लोकं क’पट नीतीने आपल्यावर वा’र करू लागतील. पुराणानुसार अशी वेळ येईल जेव्हा मनुष्यांचे जीवन काळ खूप अल्प असेल. तारुण्यावस्था वेळेच्या आधी समाप्त होईल. येणाऱ्या काही काळामध्ये मनुष्याचे आयुष्य २० वर्षे इतके असू शकते.
शास्त्रानुसार सत्य युगापासून प्रत्येक युगाचा कालखंड हा कमी-कमी होत गेलेला आहे आणि कलियुगाचा कालखंड तर सर्वात कमी आहे. शास्त्रानुसार कलियुगामध्ये पा’प आपल्या सर्वोच्च स्थानी असेल. जेव्हा हळूहळू माणसाचा व्यवहार सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध होत जाईल आणि मनुष्य एका वेळेला हिंसा करण्यामध्ये प्राण्यांपेक्षा पुढे निघून जाईल.
प्राणी आपले भूक मिटवण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला मा’रतात मात्र माणूस कोणतेही कारण नसताना दुसऱ्या माणसाला मा’रायला लागेल. देवांशी खरी श्रद्धा असणारे साधू दरिद्री होतील, अपमा’नित होतील त्याविरुद्ध ढोंगी साधू सिंहासनावर बसलेले असतील. लोकांमध्ये एकमेकांच्या प्रति हिं’साचार वाढलेला असेल. महिलांचा स्वभावही बदलेला असेल.
फक्त धनवान लोकांच्या सोबत महिला असतील. माणसांचा स्वभाव लांडग्यासारखा होईल. प्रत्येक घरांमध्ये भां’डण असेल कोणी सुद्धा एकमेकांमध्ये मिसळून राहणार नाही. कोणी एकमेकास खरे बोलणार नाही आणि सगळीकडे असत्याचा विजय असेल.गाय दुध देणे बंद करेल, मानवता न ष्ट होईल, स्त्रिया जराही सुरक्षित राहणार नाहीत,
लग्नासारखे पवित्र सं’बं’ध अपवित्र होईल, वैवाहिक जीवन अजिबात चांगले चालणार नाही, पती पत्नीमध्ये दररोज भां’डने होण्यास सुरुवात होईल, ज्या लोकांकडे शक्ती आहे त्यांचेच राज्य चालेल, कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन अन्या’य आणि हिं’साचाराच्या साम्राज्याचा अंत करतील पुन्हा एकदा ध’र्माची स्थापना करतील.