टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नर रडला..त्याची अवस्था पाहून चाहते हळहळले..जाणून घ्या त्याला काढण्यामागचे कारण काय आहे..

नमस्कार मित्रांनो..

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यांचा सर्वात यशस्वी खेळाडू डेव्हिड वॉर्नर याला टीमबाहेर बसवले होते. वॉर्नरने 2014 साली हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच त्याच्यावर टीमच्या बाहेर बसण्याची वेळ आली आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी बॅट्समनपैकी एक असलेल्या डेव्हिड वॉर्नरची हकालपट्टी अनेक क्रिकेट फॅन्सना आवडलेली नाही. त्यातच राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान वॉर्नरचा वायरल झालेला एक फोटो पाहून क्रिकेट फॅन्स चांगलेच हळहळले असल्याचे दिसत आहेत.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये वॉर्नर मान खाली घालून निराश अवस्थेमध्ये दिसत आहे. हैदराबाद टीमचा सहकारी त्याची समजूत घालत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.

वॉर्नरला टीमच्या बाहेर बसवणाऱ्या हैदराबादच्या निर्णयावर क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

हैदराबादच्या टीमनं त्यांच्या निराशाजनक खेळाचे खापर हे डेव्हिड वॉर्नरवर फोडले आहे. त्याच्या ऐवजी केन विल्यमसनकडे नेतृत्व दिलं, पण कर्णधार बदलल्यानंतरही हैदराबादसमोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा 55 रन्सने पराभव झाला आहे.

राजस्थानने दिलेले 221 रनचे आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. हैदराबादच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकही करता आलं नाही. मनिष पांडेने सर्वाधिक 31 रन केले होते.  या मॅचनंतर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

तर हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने 7 पैकी 3 सामने जिंकले असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर हैदराबादला या सीजनमध्ये 7 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले.

त्याशिवाय अनेक विक्रमांची नोंद ही त्याने केली आहे. २०२१ च्या सहा सामन्यांतील खराब निकालामुळे त्याच्याकडून प्रथम कर्णधारपद काढून घेतले गेले आणि आज त्याला अंतिम ११ मध्येही स्थान दिले गेले नाही. डेव्हिड वॉर्नरला खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाताना दिसला. कधी तो फलंदाजासाठी हेल्मेट घेऊन धावत होता. संपूर्ण संघाला आपल्या तालावर नाचवणारा वॉर्नर आज फलंदाजांच्या तालावर नाचत होता.

त्याचा हा अवतार पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांतही पाणी आले. सनरायझर्स हैदराबादकडून सर्वाधिक ४०१२ धावांचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. हैदराबाद साठी सर्वाधिक १४३ षटकार, सर्वाधिक ५०.७८ ची सरासरी, सर्वाधिक ५० धावा हे विक्रमही वॉर्नरनं केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *