मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
नवरा बायकोच्या नात्यात आयुष्यभर गोडवा टिकून ठेवण्यासाठी या 4 गोष्टी अजिबात करू नका..आपले नाते असे सांभाळा..

नमस्कार मित्रांनो..

नवरा बायकोचे नाते हे खूप नाजूक असते, खूप साऱ्या छोट्या गोष्टींचा विचार करून, एकमेकांना समजून घेऊन संसार केला तर तो संसार सुखी होतो. अन्यथा संसार तु-टायला वेळ लागत नाही. आयुष्यातील अनेक बिकट प्रसंगांना एकत्र तोंड द्यावं लागतं. आजकाल दोघेही स्वावलंबी झाल्याने एकमेकांना फारसा वेळ देता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांचं काम फार महत्वाच झालं आहे.

तसेच घरातील काही गोष्टी ठरवणे, ठराविक निर्णय एकत्र घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील प्रेम हे ऑनलाईन तात्पुरती चॅ टिं ग केल्यासारखं झालंय. आजकाल नवरा बायको मध्ये जास्त दुरावा निर्माण होत आहे त्यामुळे घ ट स्फो टा चे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे या चार गोष्टी जर नवरा बायकोने समजून घेतल्या तर त्यांचं नातं तु-टणार नाही व त्यांच्यात भांडण देखील होणार नाही. त्यातलं सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनावश्यक अपेक्षांचा भडिमार. त्यामुळे एकमेकांचे मतभेद होतात व भांडण होते.

छोट्या छोट्या कारणावरून भांडणे, संवाद कमी असणे, तिने किंवा त्याने फोनच नाही केला, इतकं कुणी बिझी असते का, हेच कपडे घालायचे, हेच जेवण आणि याच वेळी जेवण बनवायचे अशा अनेक नाहक अपेक्षा एकमेकांकडून असतात ज्यामुळे तुमचा वेळ हा विचार करण्यातच जातो जर या ऐवजी तुम्ही एकमेकांचा आदर केला, एकमेकांना समजून घेऊन काळजी घेतली तर तुमच्यातील प्रेम आणखीन वाढेल.

दुसरे कारण म्हणजे तुझे चूक आणि माझे बरोबर. ही एक सर्वात मोठी स म स्या आहे की कोणीही तडजोड करायची तयारी ठेवत नाही व त्यामुळे अनेकदा तुलनात्मक भांडण होते. माणूस म्हणल्यावर चुकणारच, चुका या होणारच त्यासाठी टोकाला न जाता समजून घेणं हे एक चांगल लक्षण आहे.

जर तुम्ही एकमेकांच्या चुका काढत बसाल तर त्या संपणार नाहीत व त्यामुळे आणखीनच बिघडेल. म्हणून शहाणपण यातच आहे की आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तिसरे कारण हे आहे की एकमेकांशी आपुलकीने न वागणे म्हणजेच एकमेकांची काळजी न घेणे.

घरातच राहतो, एकत्र आहोतच की, लागलं तर ती किंवा तो सांगेल, त्याला किंवा तिला काय झालय आणि बराच काही. परंतु अस केल्याने एकमेकाविषयी आदर कमी होतो, दोघांना एकटं वाटतं जेवढं महत्व तुम्ही स्वतःला देता तेवढच तुम्ही तुमच्या जीवन साथीला सुद्धा द्यायला हवं तरंच तुमचं नातं आणखीन दृढ होईल.

एकमेकांच्या तब्बेतीची काळजी घेणे, एकमेकांची आवर्जून विचारपूस करणे म्हणजे आजचा दिवस कसा गेला, सध्या काम कस सुरुय तेव्हाच कुठेतरी तुम्ही सोबत राहून खऱ्या अर्थाने सोबत रहाल. अतिशय महत्वाचे हे चौथे कारण ज्यामुळे आजकाल घ ट स्फो ट वाढत चालले आहेत.

ते म्हणजे विश्वासघात करणे, एकमेकांना काही गोष्टी न सांगता खोटं बोलणे, एकदा दोनदा नव्हे तर सतत खोटं बोलणे तसेच अ नै ति क सं-बंध ठेऊन आपल्या जीवनसाथीला दगा देणे हे महत्वाचे कारण आहे, तुमचं पटत नसेल तर तसे मोकळेपणाने बोला व वेगळे व्हा, एकमेकांना वेळ द्या.

स्पष्ट बोला, कारण विश्वासघात करून फक्त जीवनसाथीला नव्हे तर परिवाराला तुम्ही दगा दिलेला असतो, त्यांच्या संस्काराना पायदळी तु-डवलेलं असते, त्यामुळे नवरो बायकोतील वाद कसं मिटतील व त्याच रूपांतर संवादात कसे होईल याचा नक्की प्रयत्न करा कारण विश्वासघा-त ही अशी ठिणगी आहे तिचा वणवा कधी पे टे ल सांगता येत नाही व त्यामुळे तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकते.

असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.