परेश रावलच्या पत्नीला पाहून पागल व्हाल ! भारताची या सालची मिस इंडिया आहे..दिसायला इतकी सुंदर आणि आकर्षक..पहा फोटो

परेश रावल हे एक उत्कृष्ठ कलाकार आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबरोबरच काही विशेष भूमिका देखील अगदी छान केल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत असा खूप महत्वाच्या भूमिका त्यानी चांगल्या प्रकारे याआधीही निभावल्या आहेत.
रावल हे सन २०१४ पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. बॉलीवूडमध्ये असे खूप अभिनेते प्रसिद्ध आहेत पण परेश रावल यांची भूमिका नेहमीच लोकांच्या पसंतीस पडली आहे. परेश रावल यांनी आपल्या करियरमध्ये बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तसेच त्यांचे सर्व चित्रपट लोकप्रिय आणि सुपरहि-ट झाले आहेत त्यामुळे परेश रावल यांना उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांची “हेरा फेरी” मधील “बाबूभैय्या” ही भूमिका तर प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. पण काही लोकांना किंवा त्याच्या चाहत्यांना त्याचा परिवाराबद्दल फारसे माहिती नाही. परेश रावल यांच्या पत्नीने 1979 च्या काळात “मिस इंडिया” हा किताब पटकावला आहे.
त्याच्या पत्नीचे नाव डॉ. स्वरूप संपत असे आहे. तिचा ज न्म ३ नोव्हेंबर १९५८ ला झाला होता. स्वरूप संपत ही एक भारतीय अभिनेत्री आहे आणि तिने “नरम गरम” आणि “नाखुदा” यासारख्या फिल्म्समध्ये काम केले होते. स्वरूपने आपले शिक्षण वोर्केस्टोर यूनिवर्सिटीतून पूर्ण केले आणि स्वरूपकडे पीएचडी ही पदवी देखील आहे.
स्वरूप गुजराती परिवारात जन्मली आहे. कॉलेज शिक्षण घेत असतानाच तिने गुजराती नाटकातून कामे करायला सुरुवात केली होती.
स्वरूप संपतने बॉलीवूडच्या काही चित्रपटात कामही केले आहे. ती सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री, मॉडेल आणि निर्माती आहे. स्वरूप संपत ही फिल्म्स व्यतिरिक्त टीव्हीच्या धारावाहिकेत काम केले आहे.
परेश रावल आणि स्वरूप संपत हे दोघेही अभिनयाचे खूप शौकीन आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. परेश रावल आणि स्वरूप संपत यांची प्रथम भेट कॉलेजमध्ये असताना झाली होती. स्वरूपला पाहताच परेश रावलने ठरवले की स्वरूप संपतशीच लग्न करणार.
परेश रावलच्या नाटकातल्या अभिनयाने स्वरूप संपत त्याच्या प्रेमात पडली होती. परेश रावल सोबत लग्न केल्यानंतर त्यांना २ मुले आहेत. त्यांची नावे अनुक्रमे रुद्र आणि आदित्य रावल अशी आहेत. स्वरूप संपत आणि परेश रावल हे आजही एकत्र राहतात. अजूनही फिल्म इंडस्ट्री मध्ये दोघेही अधून मधून कार्यरत आहेत.