नमस्कार मित्रांनो..
हिंदू ध-र्मात ईश्वर पूजेला खूप महत्व आहे. अनेक देवी देवतांची पूजा, पूर्ण श्रद्धेने, शुद्ध भावाने व प्रेमाने सर्वजण करतात. जीवनातील सं-कटांना तारून नेण्याची ताकद मागण्यासाठी आपण भगवान, देवाची पूजा करतो.
देवपूजा करत असताना काही गोष्टी आपोआप घडत असतात. काही ईश्वरी संकेत आपल्याला मिळतात. परंतु काही वेळेस ते आपल्या लक्षात येत नाहीत तर काही वेळेस आपण दुर्लक्षित करतो.
देवपूजेसोबत आपण धूप, अगरबत्ती, कापूर लावतो त्यावेळी जर अचानक हा धूर घरात सर्वत्र पसरला व सर्वत्र सुगंध येऊ लागला तर समजून जा की ईश्वर साक्षात तुमच्या घरी प्रकट झाले आहेत. अशावेळी तुमच्या मनात अचानक चांगले विचार येऊ लागतात, प्रसन्न मुद्रेने तुम्ही देवाला नमस्कार करा.
आपले नशीब लवकरच बदलणार आज व भाग्योदय होणार आहे असा तो ईश्वरी संदेश असतो. पूजा करताना किंवा झाल्यावर जर तुमच्या दारात भिकारी आला किंवा लहान बालक आले तर त्यावर कधीही रागावू नका. त्याला तुम्हाला जमेल इतके दान द्या, तुम्ही त्याला अन्नदान सुद्धा करू शकता. साक्षात देवच त्या रुपात येत असतो.
दान केल्याने आपले भाग्य उजळते व धनात वृद्धी होते. पूजा करताना अचानक जर आपला दिवा जास्त प्रज्वलित झाला, वात मोठी झाली प्रकाशित झाली तर समजून जा की साक्षात भगवंत आपल्या समोर आहेत. अशावेळी तुमच्या मनातील इच्छा, अडचणी ईश्वराला सांगा. प्रसन्न झाल्यावर भक्तांच्या सर्व इच्छा देव पूर्ण करतात.
पूजा करताना जर कुणी पाहुणे आले तर तो विशेष संकेत समजावा. त्यांचा योग्य पाहुणचार करावा, त्यांचा अवमान करू नये. पूजेतील धुपाचा धूर जर कोणता आकार भासवत असेल अथवा कोणतेही शुभचिन्ह स्वस्तिक, ओम दिसले तर लगेच नमस्कार करून देवाचे दर्शन घ्यावे.
जेव्हा तुम्ही पुष्प अर्पण करता तेव्हा जर ते पुष्प आपल्या समोर येऊन पडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे भगवान तुमच्या पुजेवर खूप प्रसन्न असतात व त्यामुळे तुमच्यावर, तुमच्या घरावर त्यांची सदैव कृपा राहते. ईश्वराच्या अनेक लीला, संकेत समजून जीवन जगावे त्यामुळे होणारे नुकसान टळते तसेच होणारा धनलाभ, भाग्योदय देखील आपल्याला लगेच समजतो.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मराठी समुदायचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.