पुजा करताना मन लागत का नाही..देवाच्या फोटोला पाहून मनात अ श्ली ल, वाईट विचार का येतात..जाणून घ्या यामागील कारण आणि उपाय..

नमस्कार मित्रांनो..
भारतीय संस्कृतीत परंपरा, चालिरिती यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये दररोज अगदी न चुकता नियमितपणे घरात आपले आराध्य कुलदेव, कुलदेवी यांचे पूजन केले जाते. काही ठिकाणी तर शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातील देवांची पूजा केली जाते.
तर काही ठिकाणी कौ टुंबिक परंपरा, मान्यता यांनुसार पूजा केली जाते. भगवंतांचे नामस्मरण, पूजन अत्यंत शुभ मानले गेले आहे. मानसिक शांतता, प्रसन्नता लाभण्यासाठी देवतांचे पूजन, नामस्मरण उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. आराध्य देवता, कुलदैवत यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख, समृद्धी वृद्धिंगत होते. देवतांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता आहे.
पण आपल्याला कदाचित जाणवले असेल कि हीच पूजा करताना आपले कधी कधी मन लागत नाही आणि मग अशावेळी या पूजेचा आपल्याला काही सुद्धा फायदा होत नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला पूजा करताना कशी करावी आणि पूजेमध्ये मन लागण्यासाठी काय करावे हे जाणून घेणार आहोत.
तसेच आपल्याला माहित असेल कि अध्यत्मामध्ये तेच लोक येतात ज्याचा पूर्वी पासून या सर्वाशी सं बं ध असतो आणि दुसरे ते लोक ज्याच्या अनेक इच्छा आकांक्षा अपूर्ण असतात. पण हीच पूजा करताना आपले मन लागत नाही आणि अशा वेळी मग आपल्याला मनात अनेक वाईट विचार येतात. कामइच्छा सुद्धा वाढते, खूप राग सुद्धा येतो, समोर देवाचा फोटो किंवा मूर्तीला बघून सुद्धा आपल्या मनात वाईट विचार येवू लागतात.
कधी एकदा पूजा संपवू असे वाटू लागते. यामागचे कारण म्हणजे खरं तर या कलयुगात आपल्याला या सर्वांची सवय सुद्धा नसते तरी सुद्धा आपण पूजा करत असतो. पण यामध्ये आपला काही सुद्धा दोष नाही. आजच्या या कलयुगात आपण बऱ्याच अ श्ली ल गोष्टींना सामोरे जात असतो. मग त्या गोष्टी जाहिराती मार्फत असो वा व्हिडीओ मार्फत असो या सर्व गोष्टी कुठे ना कुठे आपल्या मनात घर करून राहतात.
जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा आपल्या मनात लपून बसलेले विचार पुन्हा बाहेर येतात. मग तुम्ही कितीही स्वताला समजवण्याचा आणि सावरण्याचा प्रयन्त केला तरीही तुमचे मन स्थिर होत नाही. मग तुम्ही भलेही देवीच्या फोटो समोर बसून जप करत असाल तरीही देवीच्या फोटोला बघून तुमच्या मनात वाईट विचार सक्रीय होतात. तर मित्रांनो या गोष्टी कधीही कोणी शेअर करत नाही या आपल्या मनात तश्याच राहतात.
असे वाटते आपलेच विचार घाण आहेत आपण खूप वाईट माणूस आहोत. मात्र मित्रांनो यात आपला अजिबात दोष नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनाला आणि श रीराला या सर्व पूजा साधनेची सवयच नसते. आणि त्यामुळेच आपण जेव्हा पूजा करायला बसतो त्यावेळी मनातले ते वाईट विचार बाहेर येत असतात.
त्यामुळे जेव्हा सुद्धा आपण पूजा करणार असतो तेव्हा आपण चांगल्या प्रकारे हात पाय धुवून पंधरा ते वीस मिनिटे ध्यान करावे, मन शांत ठेवावे. आपल्याला माहित असेल कि यामुळे आपल्या मनातील अनेक वाईट विचार निघून जातात आपले मन एकरूप आणि शांत होते आपल्या मनात सकारात्मक विचार येतात. त्यानंतर मग ध्यान करून झाल्यानंतर आपण गायत्री मंत्र म्हणावे आणि मग पूजा पाठ करण्यास बसावे.
अशा प्रकारे पूजा करायला बसल्यावर आपले पूजेमध्ये मन सुद्धा लागते आणि आपण यावेळी शुद्ध मनाने देवाकडे धनप्राप्ती, जीवनामध्ये यश, मोक्ष प्राप्ती, आपल्या इच्छा आकांक्षा आपण देवाकडे बोलू शकतो. तसेच अशावेळी आपल्या सर्व इच्छा तीव्र गतीने बाहेर पडू लागतात.
आणि मग आपण सुद्धा या आपल्या स्वप्नांकडे योग्य रीतीने वाटचाल करू लागतो आणि यावेळी देव सुद्धा आपल्या मागे खंबीर पणाने उभा राहतो. आणि मग अशा वेळी जरी आपल्या मनात वाईट विचार जरी आला तरी त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकता आणि या वाईट गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडत सुद्धा नाही.
तसेच आपण पूजा करताना तिन्हीसांजेला किंवा रात्रीच्या वेळी पूजा करताना उत्तरेकडे मुख असावे, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रातही उत्तर दिशेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. उत्तर दिशेकडे तोंड करून केलेले पूजन पुण्यफलदायी ठरते. तसेच महादेव शिवशंकराच्या पूजनात उत्तर दिशेला अधिक महत्त्व आहे.
अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. उत्तरेकडे तोंड करून केलेल्या पूजनामुळे धन, धान्य, सुख, संपत्ती वृद्धिंगत होते. उत्तर दिशा स्थिरतेचे सूचक आहे. कुबेराची कृपादृष्टी या दिशेवर अधिक असते. अशी पूर्वी पासून मान्यता आहे. आणि जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पूजेत मग्न झाला असाल, देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल, तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. आपण असेही म्हणू शकतो, की तुम्ही केलेली त्याची पुजा सफल झाली आहे.
अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.