नमस्कार मित्रांनो..
महाराष्ट्रात सध्या उन्हाची झळा बसताना सुरवात झाली असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवमान खात्याने वर्तवले आहे. यामुळे राज्यातील शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात २३ मार्च पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर काही भागात विजेच्या कडकडाने गारपीट पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने दिली आहे. सध्या राज्यात दिवसाचे तापमान हे सरासरीच्या पुढे होते तर येत्या दोन दिवसात या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
यानंतर महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याचा अंदाज असून. याच दिवसात राज्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, नाशिक, जळगाव, नगर, आरौंगाबाद आणि जालना, बीडसह पूर्ण विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे.
पश्चिमी वाऱ्यामुळे हा पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामाना खात्याने म्हटले आहे. 19 आणि 23 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज आहे. तसेच काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारताच्या पश्चिमी भागातील राजस्थानमध्ये चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी 18 आणि 19 मार्च रोजी ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 21 ते 23 मार्च दरम्यान व्यापक रुप घेण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यात गारपीट व अवकाळी पावसाने होणारा शेतीवरील परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
अनेक ठिकाणी पिके काढणीला आली आहेत. कांदा, गहू, फळबागा अशा अनेक पिकांवर याचा परिणाम दिसून येणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होवू नये. म्हणून शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान होईल याचे प्रयन्त करायला हवेत. आता शेतकऱ्यांनी काय काय उपाय करावेत ते आपण पाहू.
– वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाच्या आधीच फळबागा व भाजीपाला असणाऱ्या पिकांना आधार देण्याची योजना करावी. रस्सी असेल तारांचा वापर करून पिकांना आधार द्यावा. शेतमाल उघड्यावर असेल तर त्याला नीट झाकून ठेवावे.
– याकाळात शेताला पाणी देणे टाळावे. अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. याच काळात पावसाची पूर्वकल्पना असल्याने वातावरण बघून शेतापासून लांब जावे.
– जर आपण शेतात असाल तर उंच झाड, विजेचे खांब, पत्र्याचे शेड, लोखंडी उपकरणे यांपासून लांब राहवे. जनावरांना देखील योग्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. काढनीयोग्य पिक असेल तर आताच दोन दिवसात पिक काढून घ्यावे.
– तसेच योग्य ती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी जेणेकरून जास्तीचे नुकसान होणार नाही. हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यामुळे काळजी घेणे हे आपले काम आहे, बाकी सगळे निसर्गावर सोडून द्यावे.
अशीच उपयोगी बातमी आणि लेख वाचण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा.