नमस्कार मित्रांनो..
सुपारी मध्ये श्री गणेशाचा वास असतो जेव्हा ही एखादे शुभ कार्य असत लग्न असेल सत्यनारायण पूजा असेल होम हवन कोणत्याही प्रकारची पूजा असेल त्या ठिकाणी गणपतीच स्वरूप म्हणून सुपारी ठेवली जाते व या सुपारीची ही पूजन केली जाते. आज आपण याच सुपारीचा उपाय पहाणार आहोत.
जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. आपल्याला या सुपारीचा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल फक्त सकारात्मक विचार मनात ठेऊनच हा उपाय आपल्याला करायचा आहे.
उपाय अगदी सोपा आहे यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. आपण खाण्यासाठी वापरतो ती पूजेसाठीची सुपारी हे दोन्ही सुपारी वेगळी वेगळी असते पूजेसाठी जी सुपारी वापरली जाते ती सुपारी आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे.
या उपायासाठी आपल्याला नवी सुपारी घ्यायची आहे. म्हणजे पूजे मध्ये वापरलेली सुपारी वापरू नका. हा उपाय तुम्हाला गुरुवार पासून सुरू करायचा आहे सुपारी घरात आधिच आणून ठेवायची आहे परंतु गुरुवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. गुरुवारी सुपारीला दुधाने व नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे.
त्यानंतर ही सुपारी आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे. गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. आता या सुपारीची पुढे सात दिवस हळद कुंकू धुपबत्ती दाखवून पूजा करायची आहे. ही सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेश आहेत अशी भावना ठेऊन आल्याला पूजा करायची आहे.
पुढे सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी ही सुपारी आपल्या तिजोरीत जिथे आपण आपल्या मौल्यवान वस्तू, दाग-दागिने, पैसे ठेवतो त्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेऊन दयायची आहे. जर तुमच दुकान असेल तर दुकानातील गल्ल्यातही सुपारी ठेऊ शकता. आपण कितीही कष्ट केलात मेहनत केली तरीही जोपर्यंत नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कार्यात यश मिळत नाही.
परंतु हा उपाय केल्यानंतर नशिबाची साथ तुम्हाला मिळू लागेल. ही सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेश आहेत आणि जिथे श्री गणेशाचं वास्तव्य असत तिथे प्रत्येक कार्यात यश मिळत. जर एखाद्या कार्यात तुम्हाला अडचणी येत आहेत कार्य पूर्ण होत आला आहे वाटत असत अगदी थोड्यासाठी कार्यात अडथळे निर्मात होत असतील अपयश येत असेल हा उपाय अवश्य करा.
तुमच अर्धवट राहिलेल काम नक्की पूर्ण होईल. तुमच नशीब तुम्हला साथ देईल गणपती बाप्पा तुमचे सगळे कार्य निर्विघ्नपणे पार पाडतील. बोला गणपती बाप्पा मोरया..
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.