मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
भगवान विष्णूंना दशावतार घेण्यामागे काय कारण होते..जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती..प्रत्येक अवताराचे रहस्य..

मित्रांनो, भगवान श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत. प्रत्येक अवतार घेण्यामागे श्री विष्णूचा काहीतरी उद्देश आहे, अशी श्रद्धा आहे. तर मित्रांनो आजपर्यंत यामागील खरे कारण खूप लोकांना माहित नाही. तर मित्रांनो चला जाणून घेऊया काय आहे यामागील खरे कारण..१. मत्स्यावतार :- दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे.

आधुनिक जी’वशास्त्राचे असे म्हणणे आहे की, सर्वप्रथम पृथ्वीवरचा एकपे’शीय जी’व पाण्यात ज’न्मला. तो पे’शींची विभागणी करून प्र’जो’त्पादन करू लागला. त्यातूनच मग बहुपे’शीय सजी’व निर्माण झाले, ते लैं’गि’क प्र’जो’त्पा’दन करणारे जी’व होते. मत्स्य हा त्यातील सर्वात विकसित जी’व. याचे प्रतिक म्हणून प्रथम अवतार हा मत्स्यावतार आहे.

या अवतारामध्ये सत्ययुगात प्रभु विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. सत्यव्रत मनु, सकाळी सूर्यदेवला अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या कमंडलूमध्ये लहान मासा अचानक आला. २. कूर्मावतार :- सर्वात प्रथम प्रकट झालेल्या जलचर प्राण्यांची उत्क्रांती होत-होत, उभयचर प्राणी निर्माण झाले. कूर्म म्हणजेच कासव हा एक उभयचर प्राणी. त्याचे प्रतिक म्हणून कूर्मावतार. कूर्माचे आयुष्य इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते.

तैत्तरीय, आरण्यक आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथात याचा उल्लेख सापडतो. समुद्रमंथनाचे वेळी जेव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे समुद्राला घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली. आणि मेरू पर्वत बुडू लागला, तेंव्हा विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे.

३. वराहावतार :- जमिनीवर राहणारे प्राणी मग उभयचरांतून उत्क्रांतित झाले. त्यातील वराह हा तिसरा अवतार होय. हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे सर्व प्राण्यात उठून दिसतो. त्याची प्र ज न न शक्ती खूप अधिक आहे. यासोबत दुसरा गुण – तीक्ष्ण घ्रा’णें’द्रीय. या दैवी शक्तीमुळे त्याच्यात माग काढण्याचे कौशल्य आहे. तिसरा गुण म्हणजे,

झाडांना आपल्या शिं’गांनी समूळ उखडून टाकण्याचे कौशल्य. समूळ उच्चाटन करणे हा भाव. आणि चौथा गुण– मजबूत ताकतीचा जबडा. वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे. राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे. म्हणून हा अवतार घेतला होता.

४. नरसिंहावतार :- नरसिंह म्हणजे अर्धा नर (माणूस) आणि अर्धा सिंह (वनचर). या अवतारात श्रीविष्णूने आपल्या भक्ताची, प्रल्हादाची रक्षा केली. प्रत्येक भक्ताला हे कळून येते की, परमेश्वर हा सृष्टीच्या चराचरात वव्यापून आहे, तो जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहे. भक्त प्रल्हादाच्या कथेतून ही श्रद्धा व धारणा भक्तांच्या मनात वसवली.

५. वामनावतार :- वामन म्हणजे बुटका, म्हणजेच ज्याची शारीरिक शक्ती सीमित आहे, पण जो बुद्धीचा वापर करतो असा तो वामनावतार. पौराणिक कथेनुसार, त्याने आपल्या बुद्धीने बली असुर राजाला पाताळात धाडले. ६. परशुरामावतार :- मानवामध्ये अजून उत्क्रांती, प्रगती होत गेली. तो जीवनापयोगी व जीवन जगण्यासाठी आवश्यक ती साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर सुरू केला.

परशु (कुऱ्हाड) साठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम. त्यांनी या परशुच्या जोरावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली. भीष्म द्रोण व कर्ण यांना धनुर्विद्या शिकविणारे हेच होते. परशुरामावतार म्हणजे ब्राह्मतेज व क्षात्रतेज याचा मिलाप. ७. रामावतार :- परशु हे शस्त्र असे आहे की, त्याचा शत्रुवर फार जवळून वापर करावा लागतो. त्यामध्ये शत्रुचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो.

पुढची उत्क्रांती अशी की, स्वतःस सुरक्षित ठेऊन, दूरवरून श’त्रूवर मा’रा करता येण्याजोगे अथवा शि’का’रीसाठी लागणारे श’स्त्र मानवाने विकसित केले. प्रभू रामचंद्र हे धनुष्य व बाण वापरणारे यो’द्धा होते. राम व त्यानंतर आलेले कृष्ण, यांना पूर्णावतार म्हणतात. याचे कारण असे की, यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले. ज’न्मापासून मृ’त्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या.

८. श्री कृष्णावतार :- श्रीविष्णूचा आठवा अवतार कृष्णावतार मानला जातो. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा ज’न्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. लग्न झाल्यानंतर कृष्णाची माता देवकी आणि पिता वसुदेव यांना मथुरेचा राजा कंस रथात घेऊन जात असतो.

त्यावेळी झालेल्या आकाशवाणीत “देवकीचा पुत्र तुझा व’ध करेल” हे ऐकून मामा कंस भ’यभी’त होतो आणि त्यांना कै’देत ठेवतो. त्यांना झालेली पहिली सात अपत्ये ज’न्मताक्षणी ठा’र केली गेली. वसुदेवाने, आठवे अप’त्य ज’न्माला आल्यावर मात्र त्याला आपला गोकुळातील मित्र गोपमहाराज नंदचा घरी नेले. हेच अपत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण!

कृष्ण या शब्दाचा अर्थ “काळ्या मुखवर्णाचा” आणि “सर्वाना आक’र्षित करणारा” असा होतो. कृष्ण हा पराक्रमी, मुष्टीयो’द्धा, उत्कृष्ट सारथी, सखा, तत्त्वज्ञानी होता. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापारयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

९. बौद्धावतार :- ‘बुद्ध’ हे नाव नाही, तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ असा ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध मानतात.

जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.

१०. बालाजी अवतार :- या अवताराची देखील एक कथा सांगितली जाते. ही ऐकीव कथा अशी आहे की, भृगू ऋषी एकदा श्री ब्रम्हदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. ते श्री सरस्वतीदेवींशी वार्तालाप करण्यात मग्न होते. रा’गात येऊन ऋषींनी ब्रह्मदेवाला शा’प दिला की, पृथ्वीतलावर तुझी पूजा केली जाणार नाही. तिथून भृगूऋषी श्री महादेव शंकराकडे गेले तिथेही असंच झालं.

महादेव पार्वती आपसात मग्न! भृगू ऋषींनी महादेवाला शा’प दिला की, पृथ्वीवर तुझी केवळ लिं’ग पूजा होईल. तिथून ऋषीश्वर श्रीविष्णूंकडे गेले. श्रीविष्णू शेषशायी होते आणि श्री लक्ष्मीदेवी त्यांची सेवा करत होत्या. त्यांनी शा’प उच्चारण्यापूर्वीच श्रीविष्णूंनी त्यांचे चरण धरून माफी मागितली. ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मा’रली, तरीही श्रीविष्णूंनी त्यांचा रा’ग शांत केला.

 

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.