प्रत्येक मनुष्याला वाटते की त्याच्या घरामध्ये धन-धान्याची भरभराट असावी. लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसावी यासाठी प्रत्येकजण माता लक्ष्मीची प्रार्थना करतो. आपण नियमित माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेराचा पुजापाट करायला हवा. तसेच विविध प्रकारचे उपाय करतो.
शुक्रवारी माता लक्ष्मीचे पूजन केल्यास, काही विशेष उपाय केल्यास आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्याला मेहनतीच्या बरोबर नशिबाची साथ मिळाली पाहिजे असं सर्वांना वाटते. त्यामुळे आपण करत असणाऱ्या कामात यश मिळावे, आपली भरभराट व्हावी, घरी धनसंपदा वाढावी यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणे गरजेचे असते.
माता लक्ष्मीचा आवडता वार म्हणजे शुक्रवारी आपण जर माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला वैभव प्राप्त होते. हे काही उपाय जर आपण शुक्रवारी केले तर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर राहते. आपल्याला जरी धनप्राप्ती झाली तरी ते धन टिकून राहावे यासाठी हा खास उपाय केला जातो.
माता लक्ष्मीच्या वारा दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात लावायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पुजा करायची आहे. या पूजेमध्ये विशेषतः लाल रंगाचे फुल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे.
पूजेचा प्रसाद म्हणून गूळ आणि दूध या पासुन बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करावा. याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि जर या पूजेमध्ये लक्ष्मी यंत्र, श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र अशा सर्व प्रकारची यंत्रपुजा करावी. हिंदु शास्त्रानुसार अशी यंत्रपूजा केल्यास आपल्याला धन प्राप्ती होते आणि तसेच घरामध्ये सुख नांदते.
आपल्या घरच्या देव्हाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात श्रीयंत्र स्थापन करून त्याची नियमित पुजा करायची आहे. माता लक्ष्मी बरोबर भगवान कुबेर यांनाही धनाचा राजा मानले जाते. हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान श्री कुबेर हे सर्व धनाचे राखणदार आहेत असे सांगितले जाते. त्यामुळे कुबेर देवता आपल्याला जर प्रसन्न झाली तर धनाची कमतरता पडत नाही.
कुबेर देवतेची पूजा करणे हा देखील धन प्राप्तीचा एक मार्ग आहे. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या कोणत्याही एक मंत्राचा जप किमान 11 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त करावा. हा उपाय तुम्ही नियमित केल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण कधीही कोणाच्या धनावर वाईट नजर ठेवू नये. कोणाचीही संपत्ती किंवा धन हिरावून घेऊ नये आणि जास्तीत जास्त दान करावे. या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.