मुख्यमं’त्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची प्रेम कथा..बघा कशाप्रकारे झाली होती पहिली भेट..

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मु ख्य मं त्री आहेत. यांना 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली.
तसेच याशिवाय उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.याशिवाय 14 मे 2020 उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले, त्यावेळी शपथविधी सोहळा सगळ्यांचं लक्ष नवीन मुख्यमंत्र्यांकडे लागलं होतं.
तसेच उद्धव ठाकरे यांच्याशिवाय अजुन एक चेहरा होता, ज्यांच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्या दिवशी बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण होणार होत. तो चेहरा होता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांचा कारण त्यांनाही मिसेस मुख्यमंत्री हा मान मिळाला होता.
असे सांगितले जाते की, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या बहीण जयंती ठाकरे यांनी घडवून आणली. रश्मी माधव पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचं लग्नापूर्वीचे नाव होते. यांचा ज न्म कोकणातल्या दाबोले गावच्या कुटुंबात झाला.
याशिवाय रश्मी ठाकरे यांनी 1980 च्या दशकात डोंबिवलीतल्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचं कुटुंब मध्यमवर्गीय होते. रश्मी ठाकरे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, 1987 त्या एलआयसी मध्ये कंत्राटी स्वरूपाची नोकरी करत असताना, त्यांची जयंती ठाकरे यांच्यासोबत ओळख झाली.
मुख्य म्हणजे जयंती यांनी रश्मी यांच स्थळ आपल्या दादूला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना सुचवलं, त्यामुळे 13 डिसेंबर 1988 मध्ये उद्धव ठाकरे आणि रश्मी पाटणकर यांच लग्न झाले. तेव्हा ते फोटोग्राफी करायचे. मग कालांतराने रश्मी यांनी उद्धव ठाकरेंना राजकारणात येण्यासाठी सक्रिय बनवलं.
असे म्हणतात की, ज्या पद्धतीने मीनाताई शिवसैनिकांच स्वागत करत असत, अगदी तसंच रश्मीताई सुद्धा करतात हे विशेष. याशिवाय बाळासाहेब यांच्या आ-जारपणात कित्येक शिवसैनिक त्यांना भेटायला येत, तेव्हा त्या सर्वांना रश्मी ठाकरे जेवण केल्याशिवाय जाऊ देत नसत.
तसेच माँसाहेब मीनाताईंनी शिवसेनेचा डोलारा सांभाळला, त्याचप्रमाणे रश्मीताई सुद्धा अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांच्या गरजांकडे लक्ष ठेवतात. यासाठी रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच राजकारणाचे धडे घेतले,असे सांगितले जाते.
शिवाजी पार्कवरच्या एका दसरा मेळाव्यात “उद्धव ठाकरे हा तुम्हाला देतो” असं भावनिक वक्तव्य लाखो लोकांच्या समोर केलं होतं. त्यामुळेच बाळासाहेबांनंतर शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर टाकण्यात आली त्यावेळी त्यांना पुरेपूर पाठिंबा दिला होता.
याशिवाय शिवसेनेच्या महिला नेत्यांशी रश्मी ठाकरे यांच्याशी उत्तम संपर्क आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास करताना एक खडतर प्रवास होता, या पंधरा वर्षांच्या काळात बरेच कसोटीचे क्षण म्हणजे नारायण राणे यांचा बंड असो किंवा सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे यांची नविन पक्षाची स्थापना असो.
यावेळी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे या पावलोपावली मदत करत होत्या, ठामपणे पाठीशी उभ्या राहत होत्या.
याचबरोबर ,उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे यांनी यावेळी सत्ता समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी मोलाची मदत केली होती.
त्यामुळेच त्यांना शिवसेनेचे “मासाहेब टू” म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता त्याच्याकडे मिसेस मुख्यमंत्री बरोबरच त्या एका आमदाराच्या मातोश्री सुद्धा आहेत.आदित्य ठाकरे यांना राजकारणात आणण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच विशेष परिश्रम घेतले आहेत.
त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी स्वतः घेतली होती. याशिवाय रश्मी ठाकरे या एक उद्योजकाही आहेत. “सामवेद रियल प्रायव्हेट लिमिटेड”आणि “सन्स प्रायव्हेट लिमिटेड”या फॉर्मच्या त्या संचालिका आहेत. तसेच रश्मी ठाकरे या मोकळ्या वेळेत गझलही गातात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी नवनवीन माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.