मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
या अभिनेत्री बरोबर सलमान खान चे लग्न ठरले होते, लग्नाची पत्रिका देखील छापली गेली होती पण यानंतर झाले असे काही…

आपल्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानीने 9 जुलै रोजी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. संगीताने वयाच्या 16 व्या वर्षापासूनचं मॉडेलिं-गला सुरुवात केली होती. आणि 1980 मध्ये संगीता बिजलानी मिस इंडियाचे विजेतेपद जिंकण्यात ती यशस्वी झाली होती.

तिच्या चित्रपटा व्यतिरिक्त संगीता ही सलमान खानसोबतच्या अफेयरमुळे ती चर्चेत होती. संगीता बिजलानी ही सलमान खानशी एका काळी लग्न करण्याच्या अगदी जवळ आली होती पण त्यांनी स्वतःच हे सं-बंध तोडले. एका वृत्तानुसार 27 मे 1994 रोजी हे दोघे लग्न करणार होते. आणि सलमानने स्वत: ही तारीख निवडली होती.

संगीता बिजलानी आणि सलमान खान यांनी 1986 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी संगीता चित्रपटांमध्ये नव्हती. दोघेही सुमारे 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले आणि त्यावेळी लग्नाच्या पत्रिका देखली छापली गेली होती परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी हे लग्न मोडण्यात आले.

अनेक ठिकाणी इन्व्हिटेशन कार्ड वाटूनही त्याचे विभाजन झाले होते पण लग्न होऊ शकले नाही अशी कबुली सलमान खानने आपल्या बर्‍याच मुलाखतींमध्ये दिली आहे. त्याचं वेळी सलमान खान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या बातम्या आल्या.

संगीताला जेव्हा समजले कि सलमान सोमी अलीशी जवळीक साधत आहे. तेव्हा तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. अझरुद्दीन आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले सुद्धा होती.

पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अझरुद्दीनने संगीता बिजलानीशी लग्न केले. त्यावेळी अझरशी लग्न करण्यासाठी संगीताने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यावेळी आपले नाव तिने आयशा ठेवले. परंतु लग्नाच्या 14 वर्षानंतर संगीता आणि अझरचे नाते तुटले.

अखेर 2010 मध्ये त्यांचा घटस्फो-ट झाला.संगीता काही काळ देश सोडून परदेशात गेली. पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की संगीताच्या मदतीसाठी सलमान धावून आला आणि तिला भारतात परत आणले.

संगीताची अजूनही सलमान खानशी चांगली मैत्री आहे. सलमान खानच्या घरात अनेक कार्यक्रमांमध्ये दरम्यान संगीता खूप वेळा दिसली आहे. संगीता बिजलानी आणि सलमान खान आज एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. संगीता अनेकदा सलमानच्या घरी आणि तिच्या फार्म हाऊसच्या पार्ट्यांमध्ये दिसली आहे.

या नात्याबद्दल दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारची समजूत आहे. सुखाची संधी असो वा दुख संगीताने नेहमीच सलमानला साथ दिली आहे. पण या नात्यात बरेच चढउतार त्यांनी पाहिले आहेत. मित्रांपेक्षा प्रेम जास्त पाहिले आहे. तेही एक वेळ होती जेव्हा दोघांच्या लग्नाची प्रतीका देखील छापली गेली होती.

मुंबईतील एक हॉटेल आहे जे या दोघांचे आवडते ठिकाण होते. दोघे तिथे नेहमी भेटत असत. पण त्याच हॉटेलमध्ये या नात्यात कटुता निर्माण झाली होती. लग्नही तुटले आणि काही काळासाठी त्यांचे सं-बंधही पूर्णपणे तुटले होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.