मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
रात्रीस खेळ चाले मधील कलाकारांना बघा किती पगार मिळतो..त्यांचे खरे नाव आणि वय जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल..

नमस्कार मित्रांनो..

आपले आवडते कलाकार आपले खूप मनोरंजन करत असतात. ते रात्रंदिवस मेहनत घेऊन दमदार अभिनयाने त्यांच्या भूमिकेला पूर्ण दाद देतात. ती व्यक्तिरेखा पूर्णपणे जिवंत करून प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण करतात. आपल्या लाडक्या कलाकारांविषयी त्याचे खरे आयुष्य, जीवन आपल्याला जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते.

सध्या चर्चेत असणारे रात्रीस खेळ चालेचा सिझन 3 सुरू झाला आहे. आपल्याला या कलाकारांची खरी नावे, त्यांचे वय व त्यांचे मानधन किती भेटते याची उत्सुकता असते. पहिला मुख्य भूमिका साकारणारा कलाकार म्हणजेच अण्णा नाईक व त्यांचे खरे नाव माधव अभ्यंकर असून त्यांचे वय सध्या 58 वर्षे आहे.

तसेच त्यांना मुख्य भूमिका असल्या कारणाने पर एपिसोड 21000 रुपये इतके मानधन आहे. दुसरे पात्र म्हणजे अभिराम व त्याचे खऱ्या आयुष्यातील नाव संकेत कामत असून त्यांचे वय 25 वर्षे आहे व त्याला पर एपिसोड 18000 रुपये मिळतात. नुकतीच नवी भूमिका घेतलेल्या कावेरी जिचे खरे नाव भाग्या नायर असे आहे.

ती फक्त 24 वर्षांची आहे. तिचे सध्याचे मानधन पर एपिसोड 20000 रुपये इतके आहे. त्यानंतर अण्णांच्या पत्नी म्हणजेच माई यांचे नाव शकुंतला नरे आहे व त्या 55 वर्षांच्या आहेत. त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना 15000 रुपये इतके मानधन मिळते. तसेच आणखीन एक भूमिका साकारणारी सुषमा हिचे खऱ्या आयुष्यातील नाव पौर्णिमा देव आहे व व ती फक्त 27 वर्षांच्या आहे.

तसेच तिचे मानधन पर एपिसोड 10000 रुपये इतके आहे. अण्णांची मुलगी म्हणजेच छाया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच नम्रता कुडाळकर जी 32 वर्षांची आहे व त्या भूमिकेसाठी 13000 रुपये इतके मानधन पर एपिसोड तिला मिळते. अण्णा नाईक यांचा मोठा मुलगा म्हणजेच माधव आणि ही भूमिका अभिनेता मंगेश साळवी यांनी साकारली आहे.

तसेच तो 40 वर्षांचा आहे व त्याच्या या भूमिकेला पर एपिसोड 12000 रुपये इतके मानधन मिळते. सर्वांचा आवडता व माईंना सारखं हाका मा र णा र पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकर होय. हा अभिनेता 45 वर्षांचा आहे त्याचे पर एपिसोड 11000 रुपये इतके मानधन या भूमिकेसाठी घेतले जाते.

आशा प्रकारे हे होते मुख्य कलाकार आपल्या रात्रीस खेळ चाले 3 चे. अशाच मनोरंजक गोष्टींसाठी नेहमीच पेज अपडेट चेक करत रहा.

रात्रीस खेळ चाले 3 च्या पूर्ण टीमच्या पुढील वाटचालीसाठी मराठी समुदाय च्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.