मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
“लग्नाच्या आधी एकत्र राहू”- प्रियकर जबरदस्ती करत होता, पण पुढे असे ध’क्कादायक घडले पाहून थक्क व्हाल !

ही गोष्ट एका छोट्या शहरातून जॉबसाठी आलेल्या मुलीची आणि मोठ्या शहरातील तिला जवळुन ओळख करून देणाऱ्या एका युवकाची आहे. डॉ-क्टरनी चेक करून गेल्यावर आता अतिदक्षता विभागात शांतता पसरली होती. त्यामध्ये एक युवक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सारख्या अनेक उपकरणांच्या भरोशावर मृत्यूशी झुंज देत बेडवर निपचित पडलेले होता. या त णा व ग्र’स्त वातावरणात ड्युटीवर एक वयस्कर परिचारिका केस पेपरवर कसलं तरी काम करत होत्या.

तेव्हाच मंद प्रकाशात अतिदक्षता विभागात एक मोबाईल फोन गुरगुर असा आवाज करत होता. दुसऱ्या क्षणी त्या दिशेनं कानोसा घेत हाताचा पॅड तसाच धरुन घाईघाईने वेगळ्या दिशेने जाताना त्या बेड जवळ जाऊन त्यांनी फोन घेतला. गं भी र असलेल्या त्या पेंशटशी घरच्यांना अधून मधून बोलता, विचारपूस करता यावे यासाठी डॉ-क्टरनी फोन ठेवण्याची मुभा दिली होती.

त्या 30 ,32 वयाच्या युवकाची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याने त्याला दोन-तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.जरी तो अतिदक्षता विभागात असला तरी त्याची दिवसागणिक प्रकृती ढासळत होते. तेव्हा मोबाईल उचलून सिस्टरनी पेशंट कडे फोन देण्यास नकार दिला. त्यावेळी फोन वरून एक युवती पाच मिनिटं बोलू द्या म्हणून विनवणी करीत होती.

ती सांगत होती की आता जर मी बोलले नाही तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा सिस्टरानी मोबाईल स्पीकर वर ठेऊन बोलण्यास परवानगी दिली. तेव्हा ती व्यक्ती बोलू लागली की “अरे मंदार काहीच कस वाटलं नाही रे तुला, अखेरचा निरोप घ्यायला तरी येशील ना, असा मेसेज पाठवायला,” मान्य करते की गेल्या कित्येक दिवसांपासून तुझा कुठलाच कॉल ,मेसेजला रिप्लाय देत नव्हते.

आपल्या घट्ट मैत्रीमध्ये कधी प्रेम करायला लागलो कळले देखील नाही पण जसजसं मनाने जवळ येत गेलो माझ्या मनातल्या भावना मात्र नाही समजून घेता आल्या तुला. तेव्हा ती युवती दुःखी आवाजात बोलत होती की “एका छोट्या शहरातून आलेली मी जॉबच्या पहिल्याच दिवशी आपल्या कंपनीचे ते कॉर्पोरेट ऑफिस मध्ये मॉडेल कल्चर बघून धा’स्तावले होते.

अगदी रविवारी सुद्धा कॅलेंडर पाहून एकादशी चतुर्थी नसल्याची खात्री करूनच नॉनव्हेज करायचे की नाही ठरणारा आमचा परिवार होता. तू मात्र पहिल्या दिवसांपासून सांभाळून घेतलं मला तुझा आधार वाटायचा,तू मला तिथल्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या. तसेच त्या दिवशी सरळ तू माझ्याकडे रिलेशनमध्ये राहण्याचा आग्रह धरला आणि माझ्यासाठी तो खूप अनपेक्षित ध क्का होता.

मला वाटले की आपण आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन आपले लग्न करायचं बोलून घेणार होतो. पण तुझ्या मनात तर एक-दोन वर्षे राहू पटलं तर कोर्ट मॅरेज करू असे तू बोललास त्याने माझे मन खुप दुखावले होते,असे ती युवती सांगत होती. त्यावर ती युवती पुढे म्हणाली की लग्न न करता एकत्र राहायचं, नाही पटलं एकमेकांशी तर दूर व्हायचं, नातं तोडून वेगळं व्हायचं ,अरे ज्या लोकांमधून सोसायटीतून आले ना मी तिथं असल्या गोष्टींना मान्यता नाही.

तुला नाही वाटत का मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपलं जनरेशन जरा जास्तच गैरफायदा घेत आहे. प्रेमविवाह ठीक आहे रे तिकडे ते स्वीकारले तरी जाऊ लागले आहे. पण लग्न न करता एकत्र राहायचं माझ्या तरी मनाला नाही पटत नाही. तसेच मंदारने त्या युवतीचा खूप मोठा भ्रमनिरास केला असे म्हणावे लागेल.

त्यावर ती युवती थोडे थांबून म्हणाली की, अजूनही वेळ गेलेली नाहीये तू घातलेली साद ऐकून तुला प्रतिसाद द्यायला मी तयार आहे. मला कळतय या क्षणी मी जे काही बोलले ते सगळ तुला समजत आहे. फोन ठेवताना बोलता-बोलता शेवटी तिचा आवाज विलक्षण रडवेला झाला होता आणि तिथे फोन धरून राहणाऱ्या सिस्टर ही बोलत्या झाल्या आणि त्यानी ती युवती बरोबर बोलते, असा समजदार जोडीदार मिळायला भाग्य लागत असे मंदारला म्हणाल्या.

आज मंदारला हॉस्पिटल मधून बरा होऊन घरी जाताना त्याच्या स्वागतासाठी ती युवती उभी होती ,त्या मुलीला पाहून सिस्टर म्हणाल्या “याच्या व्हा-यरसचा आम्ही नायनाट केला आहे आता पेशंट म्हणून निगेटिव्ह आहे आणि सप्तपदी घ्यायला पॉझिटिव्ह. तसेच काळजी घ्या याची” असे सांगून त्या निघून गेल्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असे लेख आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.