लांबसडक आणि दाट केसांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट उपाय..केस इतके वाढतील की जमिनीला टेकतील..

नमस्कार मित्रांनो..
काळे, लांबसडक केस हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते किंवा ते प्रत्येक स्त्रीला आवडत असते. आपल्या सौंदर्यात हे केस भर टाकत असतात. केसांचे आ रो ग्य नीट, छान राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करून पाहू शकता. चमकदार , निरोगी दाट केस प्रत्येक स्त्रीला आवडतात. त्यामुळे तुम्ही हे केस मजबूत ठेवण्यासाठी काही छोट्या टिप्स वापरू शकता.
केसांचं आ रो ग्य कशामुळे बिघडते हे प्रथम जाणून घ्या. ते जर समजले तर आपण त्यासाठी आधीच सावध राहू शकतो, काळजी घेऊ शकतो. सध्याचे धावपळीचे जीवन व कामाचा ताण त्यामुळे केसांच्या आ रो ग्या वर परिणाम होतो. तसेच वाढते प्रदूषण देखील केस खराब होण्यास कारणीभूत असते.
त्यामुळे बाहेर पडताना शक्यतो केस कपड्याने, टोपीने झाकावे. केसांचे आरोग्य जपण्यासाठी आठवड्यात दोन तीन वेळेस योग्य तेलाने मालिश करावी. काहीवेळा त णा व, डोकेदुखी किंवा जास्त प्रमाणात पेन किलर घेतल्यास या औ-षधांचा परिणाम केसांवर होतो.
तसेच घाईघाईने जेवण करणे, फास्ट फूड, जंक फूड याचेही सेवन केल्याने केसांना पोषक तत्वे मिळत नाहीत.
कडुलिंबाची 10-12 पाने 4 कप पाण्यात उकळून घ्या व ते पाणी थोडं थंड करून त्यातील पाने काढून जे पाणी उरेल त्याने केस धुवून घ्या. हा उपाय अगदी नैसर्गिक आहे व त्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो. एका भांड्यात 1 चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकेकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल घेऊन हे मिश्रण उकळून घ्या.
थोडं थंड झाल्यावर हे मिश्रण केसांना लावा व रात्रभर ठेवा. सकाळी केस शॅम्पूने धुवून टाका. एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1
चमचा ऑलिव्ह ऑइल, 1 चमचा मध आणि 1 अंडे घेऊन एकत्र चांगलं मिश्रण करा. केसांच्या मुळापासून हे मिश्रण लावा व एक तासाने थंड पाण्याने केस धुवून टाका.
केसातील सर्व कचरा, धुळीचे कण यामुळे निघून जाऊन केस चमकदार होतात. 1 कप कच्च्या दुधामध्ये 3-4 चमचे हळद घेऊन 2 चमचे मध मिक्स करा, हे मिश्रण एक तास ठेऊन शॅम्पूने धुवून टाका. त्यामुळे केसांना पौष्टिक तत्वे मिळतात.
अंड्यामुळे केसांना एक वेगळी चमक येते व केस दाट होतात, केसांसाठी एक अंडे घेऊन ते फोडून त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा
ऑलिव्ह ऑइल घेऊन मिक्स करा. ही पेस्ट केसांना 20 मिनिटे केसांना लावून ठेवा व थंड पाण्याने शॅम्पूने केस धुवून टाका.
तसेच 1 कप मेंदी व अर्धा कप दही घेऊन भिजवून घ्या. हे केसांना मुळापासून लावा व केस संपुर्ण सुकेपर्यंत ठेवा, नंतर केस शॅम्पूने धुवून टाका. असे केल्याने केसातील धूळ साफ होते व केस स्वच्छ होतात तसेच केसांना नवीन चमक येते.
केस धुताना शॅम्पूमध्ये एक चमचा मध मिक्स करा. नेहमीप्रमाणे केस धुवून टाका. कोरफड चिरून त्यातील जेल काढा, हे केसांना लावून एक तास ठेवा. नंतर केस नेहमीप्रमाणे धुवून टाका. कोरफड हे आ यु र्वे दि क औ ष ध मानले जाते ज्यामध्ये केसांसाठी लागणारी पोषक तत्वे मिळतात.
दोन लाल कांदे कापून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या, ही पेस्ट केसांवर लावा त्यासाठी एक काळजी घ्या की रस केसांवर थापू नका. मुळांपासून हा रस मसाज करा. कांदा सुद्धा केसांना लागणारी पोषकता देतो. केसांच्या वाढीसाठी 2-3 बा यो टि न्स च्या गो-ळ्या घ्या व त्याची पावडर करा.
ही पावडर नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून मुळापासून केसांना लावा, त्यानंतर असच रात्रभर ठेवा व सकाळी नेहमीप्रमाणे केस धुवून टाका. केसांवरील हे सर्व उपाय अगदी घरगुती आहेत. हे जर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार केले तर तुमचे केस लांब, निरोगी, काळेभोर नक्की होतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.