नमस्कार मित्रांनो..
श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात एक तरी कपाट असतेच किंवा तिजोरी असते. आपला जे किमती सामान असते किंवा दाग, दागिने असतात ते आपण या कपाटात, तिजोरी मध्ये ठेवत असतो.
पगार येतो आपण तिजोरी मध्ये ठेवतो, कुठून पैसे मिळतात आपण तिजोरी मध्ये ठेवतो किंवा कपाटामध्ये ठेवत असतो, तर मित्रांनो हे कपाट आणि तिजोरी आपल्या बरकत चे स्थान असते. लक्ष्मी मातेचा वास तेथे असतो.
जर आपण ते कपाट ती तिजोरी व्यवस्थित जागेवर ठेवली तर नक्कीच आपण ज्याही वस्तू त्या कपाटात ठेवू त्यामध्ये वाढ तर नक्की होईलच तर आपल्या घरामध्ये सुद्धा बरकत होवू लागेल.
म्हणून आज आम्ही सांगणार आहोत की कपाटामध्ये ही वस्तू ठेवली तर आपला घरातला पैसा, धन धान्य कधीच कमी होणार नाही आणि कर्ज घेण्याची सुद्धा तुमच्यावर वेळ येणार नाही.
आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही खूप सोपी वस्तू आहे. ही वस्तू सहजच आपण आपल्या तिजोरी मध्ये ठेवू शकता. आपल्याला घरातील एक मुठ तांदूळ घ्यायचा आहे.
आणि शुक्रवार च्या दिवशी हा एक मुठ तांदूळ घेवून एका पांढऱ्या कापडामध्ये ठेवायचा आहे म्हणजेच या कापडामध्ये बांधयचा आहे. आता बांधलेले हे तांदूळ आपण आपल्या कपाटामध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवायचे आहे.
जेथे आपण पैसे, दाग दागिने, महत्वाचे कागदपत्रे ठेवतो तेथे तुम्हाला ते एक मुठ तांदूळ ठेवायचे आहे. यामुळे लक्ष्मीचा वास, अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरात होईल आणि कधीच तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.
तुमचा पैसा कधीच कमी किंवा खर्च होणार नाही, घरी पैसा येणे कायम सुरु राहील. तर या शुक्रवारी हा उपाय नक्की करून पहा.
अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थांवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.