मित्रांनो, प्रत्येक व्येक्तीचे एक स्वप्न असते की आपण आपल्या जीवनामध्ये खूप पैसा मिळवावा. आपले स्वतःचे चांगले घर असावे. आपल्या संपूर्ण ग’रजा पूर्ण व्हाव्यात. असे प्रत्येकाला वाटत असते परंतु मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की श्रीमंत लोक अजून जास्त श्रीमंत होत चालले आहेत. आणि गरीब लोक अजून गरीब होत चालले आहेत.
पण जेव्हा आपण बघतो कि ह्या जगामध्ये ७५% अब्जाधीश, शून्यातून अब्जाधीश झालेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे काहीही नसताना फक्त स्वतः च्या मेहनतीवर त्यांनी अमाप संपत्ती मिळवलेली आहे. ह्या जगात कोणतीही व्यक्ती भलेही आत्ता त्या व्यक्तीकडे काही नाहीये पण त्याने दृढ निश्चय केला तर तो नक्कीच एक दिवस करोडपती, अब्जाधीश होवू शकतो. ह्या ७०% लोकांमधील ५ कॉ’मन नियम आपण पाहुयात.
१. मनात १००% विश्वास असू द्या, मी नक्की करोडपती होणार :- श्रीमंत होण्याची सुरुवात तुमच्या श्रीमंत मानसिकता मधून होते. तुमच्या मनामध्ये १००% विश्वास पाहिजे की एक दिवस मी नक्की करोडपती होणार. आणि यामध्ये तुम्हाला जरा सुद्धा सं’शय नसावा. नेहमी सकारात्मक विचार करत रहा आणी तुमचे जे काही ध्येय आहे त्याच्याबरोबर चालत रहा.
त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करा इतके प्रयत्न करा की ते ध्येय अगदी तुम्ही सहजपणे मिळवाल. आपला मराठी माणूस सर्वात मोठी चूक करतो त्याला अस वाटतच नाही की आपण सुद्धा आयुष्यात करोडपती किंवा अब्जाधीश होवू शकतो. त्याला असे वाटते करोडपती फक्त गुजराती, मा’रवा’डी होवू शकतात. आता आपण सध्या करोडपती होण्याचा विचारच करत नसाल तर,
तुम्ही वास्तविक आयुष्यामध्ये कसे करोडपती होणार. म्हणून मित्रांनो पहिल्यांदा विचार करायला शिका. आणी त्यानंतर त्या विचाराने पुढे प्रयत्न करण्यास चालू करा. वॉरन बफेट ज्यांची ८१००+ करोड पेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यांनी लहानपणी शपथ घेतली होती. की, मी जर ३० वर्षाच्या आत मिलेनिअर झालो नाही, तर मी बिल्डींग वरून उडी मारील.
त्यामुळे मनात एक विचार पक्का करून ठेवा. एक दिवस मी नक्की करोडपती होणार. २. तुमचे करोडपती होण्याचे ध्येय गाठण्यासाठी कॅल्क्युलेशन करा :- कोणतेही ध्येय गाठण्यासाठी स्वतः वर विश्वास पाहिजे. की मी ते ध्येय पुर्ण करू शकतो. एकदा का करोडपती होण्याचे ध्येय ठरवले की आता तुम्हाला थोडे कॅल्क्युलेशन करायचे आहे. कोणकोणत्या मार्गाने मी पैसे कमवू शकतो.
जस की तुम्हाला १० हजार लोक शोधावी लागतील. तेव्हा तुम्ही १ हजारचे प्रॉडक्ट विकू शकता. तेव्हा तुम्हाला १ करोड मिळतील. किंवा तुम्हाला १० हजार असे लोक शोधावे लागतील जे तुम्हाला १०० रुपये १२ महिने देतील. तेव्हा तुम्ही माहिण्याला १० लाख रुपये तर एका वर्षात १.२० करोड रुपये मिळू शकता. थोडक्यात काय तर फक्त ध्येय ठरवून गप्प बसू नका,
योग्य कॅल्क्युलेशन करून त्यावर काम करायला सुरुवात करा. ३. तुमचे उत्पन्नाचे मार्ग वाढवा :– एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला जाणीव होईल करोडपती होणे जास्त अवघड नाहीये. आता तुम्हाला उत्पन्नाचे मार्गावर भर द्यायचा आहे. आज इंटरनेटच्या युगात तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमवू शकता. जस की युटुब चॅनल, ॲप बनवून, ब्लॉग्ज, ऑफिलियेट मार्केटिंग,
वेब डिझाईन, ई-कॉमर्स, रिअल इस्टेट, शेअर मार्केट, एखादा साईड बिझनेस, टिचींग, इत्यादी. असे मित्रांनो अनेक मार्ग आहेत. ४. कोणत्या प्रकारच्या लोकांकडून तुम्ही पैसे मिळवू शकता, त्यांचा शोध घ्या :– स्वतः ला एक प्रश्न विचारा माझा पैसा नक्की कोणाकडे आहे ? म्हणजे तुमच्या आजूबाजूला अशी कोणती लोक आहे. ज्यांना तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता, किंवा सर्व्हिस देऊ शकता.
व’की’ल, विद्यार्थी, डॉ’क्टर, शिक्षक, व्यावसायिक, नोकरदार, ह्यांची एक यादी बनवा. आता तुम्ही ह्या लोकांना कोणते प्रॉडक्ट विकू शकता, किंवा त्यांना कोणती सर्व्हिस देवू शकता, किंवा असे मार्गदर्शन करू शकता, ज्याचे ते तुम्हाला पैसे देतील, ह्याचा विचार करा. असे केल्याने तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचतील. या जगात पैशाची कमी नाहीये.
तुम्हाला फक्त योग्य नियोजन करून अशा लोकांचा शोध घ्यायचा आहे. ज्यांना तुमची गरज आहे. ५. तुमचा खिसा नेहमी रिकामा ठेवा :– तुम्ही कितीही पैसे कमवा तुमचा खिसा नेहमी रिकामा ठेवा. याचा अर्थ काय तर तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात झाली की लगेच त्याची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. ते पैसे बँ’केत साठवून ठेवू नका. कारण जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा आपण अनावश्यक खर्च करतो.
तेव्हा मग आपण गरज नसलेल्या गोष्टी सुद्धा विकत घेतो. अशाने वायफळ खर्च होतो. आणि दुसरे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही पैशाला कामाला लावता तेव्हा तो पैसा अजून जास्त पैसे तुम्हाला कमवून देतो. आणि तुमची श्रीमंती कडे वाटचाल होते. बँ’केत कमी पैसे असण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला अजून पैसे मिळवण्यासाठी मोटिवेशन मिळते.
आणि ह्याचा फायदा तुमच्या करोडपती होण्याच्या वाटचालकडे सुखकर घेवून जाईल तुम्हाला व यशस्वी व्हाल. सूचना :- मित्रांनो वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रु’टी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.