मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
श्री स्वामी समर्थांना आवडणाऱ्या गोष्टी जाणून घ्या..यांचा उपयोग करून आपण स्वामींना प्रसन्न करू शकता..

नमस्कार मित्रांनो..

विज्ञान आणि देव किंवा ईश्वरीशक्ती या दोन मुद्यांवर नेहमीच अनेकांचे मतभेद होत असतात. विज्ञानवादी आणि बुद्धीवादी दैव, देव, ईश्वरीशक्ती या गोष्टी काही मानत नाहीत. अशा गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध होत नाही, त्या गोष्टींचे अस्तित्व विज्ञानवादी मानत नाहीत.

देव आहे की नाही, हा एक मोठा वाद या सं दर्भात जागोजागी पाहायला मिळतो. दुसरीकडे, विज्ञानाचे मत काही असले, तरी देव, ईश्वरीशक्ती आहे, असे मानणारा मोठा वर्ग आहे. कोट्यवधी श्रद्धाळू दररोज कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती, नामस्मरण, आराधना, जप, उपासना करीत असतात.

त्यामुळे आज आम्ही आपल्याला व स्वामी समर्थाच्या असंख्य अशा भक्तांना स्वामी समर्थाना आवडणाऱ्या पाच गोष्टी सांगणार आहोत आणि जे भक्त या गोष्टी पाळतात त्यांना स्वामी समर्थ आशीर्वाद देतात आणि त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. तसेच अशा भक्तांना स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात भेट सुद्धा देतात.

तसेच आपल्याला माहित असेल कि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्त सं प्र दा या त ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत.

आणि आज आपण आपल्या स्वामी समर्थाना कोणत्या गोष्टी आवडतात त्या जाणून घेणार आहोत. आपणास सांगू इच्छितो कि स्वामी समर्थांना कुत्र्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे कधी सुद्धा आपल्या दारात कुत्रा आला तर त्याला काही तरी नक्की खायला द्या.

यामुळे नक्कीच आपल्याला स्वामींचे अनेक आशीर्वाद मिळतील. तसेच स्वामी समर्थाना भगव्या रंगाची फुले खूप प्रिय होती. त्यामुळे आपण पूजा करताना स्वामी समर्थाना भगवी फुले अर्पण करावी. तसेच स्वामीना खाण्यामध्ये पुरण पोळी, बेसनाचे लाडू, तसेच खीर, आणि अनेक प्रकारच्या भाज्या या अतिशय प्रिय होत्या.

त्यामुळे आपण स्वामी समर्थाना पूजा करताना प्रसाद म्हणून गोड काही तरी किंवा दूध ठेवावे आणि स्वामीची मनोभावे पूजा करावी यामुळे स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात. पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, आपण स्वामींची इतकी सेवा केली, तरी महाराज अजून का प्रसन्न होत्त नाहीत?

अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दु:खे असतात. दु:ख सं क टे एकामागून-एक येतच राहिली, तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दु:खे का? इतके नामस्मरण केले, तरी महाराजांना आपली दया येतच नाही का?

आणि निराशेने कधी-कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात, पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की, आपण प्रा र ब्ध भो गा तू न मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे.

आपले स्वामी तर इतके दयाळू आहेत की, ते दु:खातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात. जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात.

म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही हेच स्वामी विद्यारण्यांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दु:ख सं क टे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.