सरकार करणार नवे चांगले बदल: पेन्शन, एलपीजी गॅस सिलेंडर दरात मोठा बदल..आपल्याला यामुळे फायदा होईल..जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..
सरकारी नियम जेव्हा बदलतात, जे काही नवीन बदल येत असतात त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसणार की आपले पैसे कसे आणि कुठे वाचणार हे आपल्याला कळते. त्यामुळे आपण सरकारी बदल जे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावू शकतात ते समजून घेतले पाहिजेत त्यामुळे आपल्याला आपल्या घरचे आर्थिक नियोजन करण्यासाठी मदत होते. जे काही बदल सरकारने या नियमात केले आहेत ते तुम्हांला माहीत असायलाच हवेत.
मे पासून मिळणार संपूर्ण पेन्शन:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सेवानिवृत्तीनंतर १५ वर्षानंतर पूर्ण पेन्शन रक्कम भरपाई करण्याची तरतूद सरकारने नुकतीच पुन्हा सुरू केली. त्याअंतर्गत आता मे पासून संपूर्ण पेन्शन योजना सुरू केली जाईल. ज्यांनी या पर्यायाची निवड केली त्यांना काही काळानंतर पूर्व स्थितीच्या स्वरूपात संपूर्ण पेन्शन मिळते. 2009 मध्ये हा नियम मागे घेण्यात आला.
एटीएम सं बं धि त हा नियम जाणून घ्या:- देशात को-रोना वि षाणूचा फै-लाव रोखण्यासाठी सरकारने लॉ-कडाऊन जाहीर केले होते, अधिक काळजीसाठी एटीएम सं बं धित असणारे नियम सुद्धा बदलण्याचा निर्णय झाला. प्रत्येक व्यक्तीने एटीएम वापरल्यावर त्या ठिकाणी लगेच स्वच्छता केली जाईल, चेन्नई मध्ये ही व्यवस्था सुरू केली आहे. तसेच जिथे हॉ ट स्पॉ ट आहे म्हणजेच खूप जास्त प्रमाणात को-रोनाचे रुग्ण आहेत अशा ठीकाणी व महापालिकेकडे आता दिवसातून दोन वेळा स्वच्छता होणार आहे.
बो र्डिं ग स्टेशन चार तासांपूर्वी बदलता येणार:- को-रोनाच्या काळात खूप दिवस रेल्वे सेवा बंद होती, त्याची स्थगिती असताना काही नियम बनवण्यात आले. भविष्यात रेल्वे सेवांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला त्यानुसार प्रवासी चार्ट प्रसिध्द होण्यापूर्वी चार तासांपर्यंत बो र्डिं ग स्टेशन बदलता येणार आहे तर याआधी हे स्टेशन प्रवासी प्रवासाच्या आधी २४ तास आधी त्यांचे बो र्डिं ग स्टेशन बदलू शकत होते.
एलपीजी गॅस सिलेंडर दरात घट:- दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेल कंपन्या दर बदलत असतात. त्यानुसार ते नियम बनत असतात व गॅस सिलेंडर च्या किंमतीत वाढ किंवा घट होत असते. १ मे पासून या किमती कमी होणार असून विना अनुदानित गॅस सिलेंडर व अनुदाणीत गॅस सिलेंडर स्वस्त होणार आहेत ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे.
बचत खात्यावर व्याज कमी होणार आहे:- भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याज कमी केले आहे, जे आधी जास्त होते. एक लाखाहून अधिक रक्कमेची ठेव जर असेल तर त्यावरील व्याज कमी करण्यात आले आहे ते आता २.७५% आहे जे आधी ३.२५ % होते. तर एक लाखाच्या आतील ठेवींच्या रकमेवर तुम्हाला ३.५०% व्याजदर मिळणार आहे. त्यामुळे ही एक गं भी र बाब जो बदल केला आहे तो लक्षात घ्या.
विमान तिकीट रद्द केल्यावर आता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही:- एअर इंडिया या सरकारी कंपनीने विमान प्रवाशांना मोठू खुश करणारी बातमी दिली आहे , याआधी बुकिंग रद्द केल्याने अतिरिक्त शुल्क आकारले जायचे परंतु आता तसे होणार नाही, बुकिंग केल्यावर २४ तासाच्या आत जर तुम्ही तुमचे तिकीट रद्द केले तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पीएनबीचे डिजिटल वॉलेट आता बंद करण्यात आले:- पंजाब नॅशनल बँकेचे जर तुमचे खाते असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. पीएनबीचे डिजिटल वॉलेट सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे जर तुमचे खात्यात पैसे असतील तर ती रक्कम आयएमसी सेवा वापरून ते पैसे काढून घ्यायचे आहेत.