मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
हे करा कधीच घरात कटकटी होणार नाही..घरात सतत भांडणे, वाद होत असतील तर हा उपाय करावा..

जर घरात कटकटी होत असतील तर त्या घरात कधीच सुख टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही म्हणून. जर तुमच्या घरामध्ये खूप कटकटी होत असतील तर तिथे लक्ष देण्याची गरज आहे आणि तुम्हाला जर अस वाटत आहे तुमच्या घरामध्ये सतत खूप कटकटी होतात तर तुम्ही हे करा कधीच घरामध्ये कटकटी होणार नाहीत.

आपल्या घरात कटकटी होतात त्या काही दोषा मुळे काहीतरी नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते. यासाठी काही तोडगे काही उपाय आहेत जे तुम्हाला सांगणार आहे हा उपाय नक्की करून बघा याचा अनुभव नक्की तुम्हाला येईल. तुमच्या घरात जर कटकटी होत असतील तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळी जप करा.

सकाळी 11 माळी संध्याकाळी 11 माळी हा जप तुमच्या घरातील एका सदस्यानी तर केलाच पाहिजे. त्या सोबतच घरात रोज गोमूत्र शिंपडावे सकाळी उठल्या नंतर अंघोळ करून घराची साफ सफाई करून घरात सर्व रूम मध्ये गोमूत्र आवश्य शिंपडावे याने नकारात्मकता वाईट शक्ती लगेच निघून जाते.

त्या सोबतच देवघरामध्ये सकाळी पूजा करताना 1 ग्लास पाणी ठेवावे आणि देवपूजा झाल्या नंतर ते पाणी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना थोडे- थोडे प्यायला द्यावे किंवा जे ही आपले पिण्याचे पाणी असेल त्यात एकत्रित करावे जेणे करून ते पाणी घरचे सर्वजण पितील.

त्या पाण्यात दैवीय शक्ती उतरते सकारत्मकता उतरते आणि त्यामुळे सर्वांचे मन प्रसन्न राहते समाधानी राहते आणि मग घरात कटकटी होण्यासाठी कोणतेही कारण आपल्या घरात उरत नाही. घरात सकारात्मकता वावरेल सुख, समृद्धी येईल. कापूराचा धुर संध्याकाळी प्रसन्नता, समाधान, समृद्धी आणते तर तुम्हीही घराचे सगळे दरवाजे, खिडक्या 5 मिनिटा साठी बंद करून हा कापूर जाळावा आणि कापूर विजल्या नंतर लगेच खिडक्या, दरवाजे उघडावे. जर कटकटी होत असेल तर हा उपाय नक्की करा. याने नक्की लाभ होईल.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.