मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
१३ मार्च: मोठी शनिअमावस्या फक्त याठिकाणी लावा दिवा..व्यवसायात मोठा नफा, कर्ज मिटेल, रोग आजारपण होईल दूर..

नमस्कार मित्रांनो

१३ मार्च शनिवारचा दिवस आणि यादिवशी आली आहे शनि अमावस्या. माघ महिन्यात आलेली ही अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी आल्यामुळे याचे महत्व आणखी वाढले आहे. शनिवारी आल्यामुळेच या अमावस्येला शनि अमावस्या असे म्हणतात. शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयन्त अनेक लोक करतात.

कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती चालू असेल तर अनेकदा आपल्याला नोकरी लागत नाही, व्यवसायात नफा मिळत नाही, आपली प्रगती होत नाही. आणि अशावेळी आपण शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता. या दिवशी हा उपाय कसा करायचा आहे ते आपण व्यवस्थित समजून घ्या.

तर या शनि अमावस्येच्या दिवशी आपणास सायंकाळी शनिमंदिरात जायचे आहे. त्याठिकाणी जावून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली 9 दिवे लावायचे आहेत. जर तुमच्या घराजवळ शनिदेवाचे मंदिर नसेल तर काळजी करू नका. आपल्या घराच्या जवळ कुठे असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जावून आपण हा उपाय करू शकता.

मित्रांनो अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. आपल्याला या झाडाखाली जावून 9 दिवे लावायचे आहेत. या दिव्यांमध्ये मोहरीचे तेल असेल तर अति उत्तम. तर असे बरोबर ९ दिवे आपणास तिथे प्र ज्व लि त करायचे आहेत.

त्यानंतर आपण या पिंपळाच्या झाडाची 9 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. बरोबर मोजून ९ प्रदक्षिणा घाला. यानंतर पिंपळ वृक्षा समोर मनोभावे हाथ जोडून आपण आपली इच्छा मागायची आहे.

मित्रांनो या प्रदक्षिणा घालताना किंवा हे दिवे लावताना आपण ओम नमः भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करू शकता. मनोभावे हाथ जोडून आपली जी काही स म स्या आहे ती आपण मांडवी. यासोबतच शनिदेवाचा जो कोणता मंत्र आपणास येतो त्या मंत्राचा जप आपण करू शकता.

ओम शनैश्चराय नमः या शनिदेव मंत्राचा जप आपण अवश्य करा. आपली ही प्रार्थना यादिवशी शनिदेवापर्यंत नक्की पोहचेल आणि आपली जी काही इच्छा आहे ती ताबडतोब पूर्ण होईल.

अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.