१४ एप्रिल: स्वामी महाराजांचा प्रकट दिवस स्वामींना दाखवा हा विशेष नैवद्य..स्वामी होतील प्रसन्न, मनातल्या सर्व इच्छा होतात पूर्ण..

श्री स्वामी समर्थ
मित्रांनो 14 एप्रिल स्वामींचा प्रकटदिवस. स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने श्री दत्त प्रकट झाले.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होत.
स्वामींचा प्रकट दिवस म्हणजेच 14 एप्रिल 2021, यावर्षी सर्वत्र को रो ना चे थैमान सुरू आहे, त्यामुळे स्वामींची सर्वत्र असणारी केंद्र बंद आहेत तसेच स्वामींचे अक्कलकोट याठिकाणी मंदिरात प्रवेश सुद्धा सरकारने बंद ठेवला आहे त्यामुळे स्वामी भक्तांसाठी मोठा उत्सव असणारा हा पवित्र असा प्रकट दिनाचा दिवस सर्वांनी शांततेत घरीच साजरा करायचा आहे.
सर्वांनी घरी राहून आपली स्वामी सेवा अखंड सुरूच ठेवायची आहे. स्वामींच्या सेवेनंतर तुम्हाला एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे. हा विशेष नैवेद्य म्हणजे स्वामींचे आवडते पदार्थ ज्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील.
या विशेष नैवेद्यासाठी तुम्ही गोडधोड करू शकता. पुरण पोळीचा नैवेद्य म्हणजेच खास नैवेद्य होय. पुरणपोळी सोबत दूध, तूप, खीर केली तरी चालेल व सोबत कांदा भजी करा. जर तुमची परिस्थिती नसेल तरी त्यांनी साधा विशेष नैवेद्य दाखवावा त्यांनी चपाती, भाजी व व गोड शिरा जरी करून स्वामींना नैवेद्य दाखवला तरी त्यांची सेवा स्वामी गोड मानून घेतील.
एखाद्याची परिस्थिती अगदीच बिकट असेल तर त्यांनी साधी पोळी भाजी व थोडं वाटीत दूध घालून त्यामध्ये एक चमचा साखर मिसळून ते तुम्ही नैवेद्य म्हणून सेवेत अर्पण करू शकता. स्वामींना प्रसन्न, शुद्ध मनाने भक्ती करणारे भक्त आवडतात.
स्वामींना शुद्ध भावना असणारे भक्त अतिशय प्रिय आहेत. स्वामी भक्ती जर तुम्ही अत्यंत मनापासून मनात अडी न ठेवता केली तर स्वामी आपले आयुष्यच बदलून टाकतात, आपली परिस्थिती सुधारते व स्वामी आशीर्वादाने आपली प्रगती होते.
त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वामींची आवडती पुरणपोळी व कांदा भजी जरूर दाखवा व ज्यांना ते शक्य नाही त्यांनी निःसंकोचपणे स्वामी भक्ती अखंड करा व साधा दूध साखरेचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. स्वामी प्रसन्न होतील व पुढच्या वेळेस तुमची परिस्थिती सुधारून तुम्ही पुरण पोळी व पंच पकवान दाखवाल.
असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.