नमस्कार मित्रांनो..
चैत्र महिना म्हणजे पवित्र महिना व या महिन्यांतच आपले हिंदू नववर्ष सुरू होते. तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांचे महत्व आहेच परंतु यावर्षी 2021 साली चैत्र पौर्णिमा मंगळवारी 27 एप्रिल ला आली आहे, ही पौर्णिमा खास आहे कारण इथे दुर्मिळ महासंयोग आला आहे,
मंगळवारी व हनुमान जयंती सोबत घेऊन ही पौर्णिमा आली आहे, या दिवशी तुम्ही जे काही स्वतःच्या प्रगतीसाठी उपाय, पूजा कराल त्यावर हनुमान लगेच प्रसन्न होतात. हनुमंताचे पूजन मंगळवारी केल्याने भरपूर लाभ होतो तसेच जर मंगळवारी हनुमान जयंती आली तर आणखीनच फा य दा होतो.
आणि जर पौर्णिमेला हनुमान जयंती व मंगळवार हा अतिशय दुर्मिळ योग आला आहे त्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळू शकतो जर तुम्ही हनुमान पूजन असे केले व चमत्कारिक उपाय केले तर तुमचं आयुष्य सुखी, समृद्ध होईल.
हनुमान हे चिरंजीवी आहेत, म्हणजे ते अजूनही भूलोकावर अवतरीत आहे. असे आपले शास्त्र सांगते गु प्त रुपात ते त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात, त्यांच्या सं-कटात मदत करतात अशी मान्यता आहे. पौर्णिमेचा दिवस हा पवित्र मानला जातो, या दिवशी भर दुपारी 12 वाजता हनुमान मारुतीचा जन्म झाला.
यादिवशी आपण स्वच्छ स्नान करून जवळच्या हनुमान मंदिरात मारुतीचे दर्शन घेऊन या. सोबत मोहरीचे तेल किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन तिथे लावा. या दिवशी शक्य तितके हनुमान जप, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा पठण करावी. ब्रम्हचर्य पाळावे. सात्विक भोजन करु नये, मांसाहार, म द्य पा न व र्ज्य करावे. श्री हनुमानाचे पूजन केल्याने बुद्धी, यश, शौ र्य, सामर्थ्य अं गी येते.
तुमच्या आयुष्यात जर धनलाभ होत नसेल, खूप साऱ्या आर्थिक अडचणी असतील, सतत चिडचिड होत असेल, खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर तुम्ही या दिवशी हनुमान पूजन नक्की करा. पिंपळाच्या झाडाचे खास महत्व आहे, त्याचाच उपाय आपण आज करायचा आहे.
हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकता. त्यासाठी 11 पिंपळाचे पाने घ्या व त्यावरती श्री राम असे लिहायचे. घरातील देव पुजेत वापरले जाणारे कुंकू तुम्ही यासाठी वापरू शकता. किंवा हनुमंत प्रिय शेंदूर याचा देखील वापर करू शकता. हे थोडं पाण्यात मिसळून त्याने श्री राम असे पिंपळाच्या त्या पानांवरती लिहा.
या पानांची माळ बनवली तरी चालते किंवा पाने एकत्र करून मारुतीला अर्पण केली तरी चालतात. हा उपाय म्हणजे तुमच्यावर मारुतीची कृपा अखंड रहावी, तुमच्या प्रत्येक कामात यश मिळावे यासाठी केला जातो. तसेच भगवान श्रीराम जप केल्याने श्री राम प्रसन्न होतात.
तसेच हनुमान देखील प्रसन्न होतात. या दिवशी तुम्ही गोर गरिबांना अन्नदान करू शकता. तसेच जास्तीत जास्त सत्कर्म करा. गरजूंना मदत करा.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.