९ मे: स्वामींची पुण्यतिथि तुमची इच्छा बोलून स्वामींसमोर बोला हा मंत्र..काही दिवसातच इच्छा पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले.
मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली.
यंदा 9 मे या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त नामजपासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती.
सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले, तसेच स्वामींना दिगंबर दत्ताचा अवतार देखील मानतात. पद्मासनात बसलेली एक प्रसन्न व्यक्ती, हाती एक मणी, चेहऱ्यावर युगायुगांच्या खुणा, असीम तेज असे ते स्वामींचे रूप पाहून भक्त प्रसन्न राहतात.
स्वामींची अनेक रुपं आपल्याला पाहायला मिळतात. माऊलीच्या रुपात देखील स्वामी शांत व आपल्याला आधार देणारे वाटतात. परंतु त्यांचे रूप जे मूळ स्वरूपात आहे ते म्हणजे पद्मासनात चैतन्यमूर्ती व श-रीरावर तेजस्वी वलये, साधनेचे अमोघ तेज पाहायला मिळते.
स्वामींच्या प्रतिमेसोबत एक वाक्य कायम असते जे आपले भय, चिंता दूर करते ते म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. स्वामींच्या या पुण्यतिथी दिवशी स्वामींची सेवा करावी. जितकी जास्त जमेल तितकी जास्त करा. घरातील सर्वांनी मिळून यंदा घरीच स्वामींची मूर्ती पूजा करा, फोटो पूजा करा.
स्वामींच्या सेवेतील सर्व गोष्टी जाणून समजून घेऊन करा व तसेच स्वामींच्या आवडत्या वस्तू, पदार्थ करा व नैवेद्य दाखवा. स्वामींचा हा मंत्र सकाळी, सायंकाळी जेव्हा जमेल तेव्हा करा. एक माळ हा मंत्रजप करा. त्यामुळे मनाला शांती मिळेल, मार्ग सापडतील, इच्छा पूर्ण होतील. तुमची इच्छा बोलून स्वामींना प्रार्थना करा की येणाऱ्या सं-कटाला तोंड देण्याची ताकद दे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या महामंत्राचा जप करा, कमीतकमी एक माळ जप करा व तुम्हाला जर शक्य असेल तर जास्त सुद्धा करू शकता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल, असणाऱ्या अडचणीतून मार्ग निघेल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.