श्री स्वामी समर्थ..
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारा गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज. चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.
चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले. सं’कटांचा काळ हा आपली कठीण परीक्षा घेत असतो त्यावेळी भिऊ नकोस पुढे चाल अस म्हणणारं कोणीतरी लागत, आपल्याला त्यावेळी आधाराची खूप गरज असते.
स्वामीजी भक्तांना सांगतात की तू थांबू नकोस पुढे चालत रहा, प्रयत्न सोडू नकोस, निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठिशी आहे, तू पडलास तर तुला हात देईन, तू प्रयत्न करशील तर यश देईन. अनेक लोकांना त्यांची कुशलता असूनही नोकरी नाही त्यामुळे अनेक युवक निराश आहेत.
नोकरीची टंचाई असल्याने त्यांना नोकरी मिळत नाहीये, त्यामुळे सध्या खूपच अवघड स्थिती झाली आहे. नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाहीये. त्यामुळे काही गोष्टी श्रद्धा ठेवून केल्या तर त्या पूर्ण होतात. जसे की स्वामी समर्थांची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
अशी एक सेवा जी तुम्ही सातत्याने केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी चमत्कार सुद्धा करत होते व त्यांच्या शिष्यांना ते खुप चांगल्या प्रकारे ज्ञान देत असे. अनेक भक्त स्वामींच्या मठामध्ये येऊन स्वामींची सेवा करतात, स्वामी सेवा काय असते, ती कशी करावी हे सर्व मनापासून शिकतात.
स्वामींचा गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या जीवनाचा आधार आहे. आपलं जीवन जगताना तो आपल्याला खूप मदत करतो. गुरुचरित्र ग्रंथातील 14 वा अध्याय जर तुम्ही रोज सकाळी वाचला तर थोड्याच दिवसात तुम्हाला यश मिळेल. याची सुरुवात मोठ्या उत्साहाने स्वामींच्या नाम घोषाने करा व ती गुरुवारी करा व तुम्हाला यश मिळतोवर करा किंवा तिथून पुढं सुरू ठेवलात तरी उत्तमच होय.
यासोबतच तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचा पाठ दररोज करायचा आहे. हा पाठ तुम्हाला 40 दिवस करायचा आहे. म्हणजे तुम्ही 40 दिवस 40 पाठ व्यंकटेश स्तोत्राचे करायचे आहेत. जर तुम्ही हे दोन उपाय संपूर्ण मन लावून, शुद्ध बुध्दीने जर केले तर तुम्हाला नक्कीच आपल्या व्यवसायात यश मिळेल व आपली प्रगती होत राहील तसेच नोकरी शोधत असलेल्या गरजूंना मनासारखी नोकरी मिळेल.
असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.