14 एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिवस 21 वेळेस बोला हा मंत्र..जे मागाल ते मिळेल..सर्व इच्छा पूर्ण होतील..

श्री स्वामी समर्थ..
14 एप्रिल स्वामींचा प्रकटदिवस स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-ध-र्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होत.
स्वामींचा प्रकट दिवस म्हणजेच 14 एप्रिल. पण यावर्षी सर्वत्र को-रोनाचे थैमान सुरू आहे, त्यामुळे स्वामींची सर्वत्र असणारी केंद्र बंद आहेत तसेच स्वामींचे अक्कलकोट याठिकाणी मंदिरात प्रवेश सुद्धा सरकारने बंद ठेवला आहे त्यामुळे स्वामी भक्तांसाठी मोठा उत्सव असणारा हा पवित्र असा प्रकट दिनाचा दिवस सर्वांनी शांततेत घरीच साजरा करायचा आहे.
सर्वांनी घरी राहून आपली स्वामी सेवा अखंड सुरूच ठेवायची आहे. घरी राहूनच स्वामींचा हा मंत्र तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळेस जपायचा आहे. स्वामींच्या प्रकट दिनाचे विशेष असे महत्व आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनी या दिवशी जर हा मंत्र जप केला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
स्वामींचा आशिर्वाद तुम्हाला लाभेल. हा मंत्र सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शुद्ध भावनेने स्वामींची सेवा करत याचा जप करा. हा मंत्र म्हणजे श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप तुम्ही कमीतकमी 21 वेळा तर जास्तीत जास्त 108 वेळेस करू शकता. तुम्हाला त्याची नक्की प्रचिती येईल व तुमच्या आयुष्यातील अडचणी स्वामी दूर करतील.
स्वामींच्या या मंत्र जपाने तुमच्या घरात सकारात्मक व सात्विक ऊर्जा निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या घरात सदैव सात्विकता भरून राहील. स्वामींची सेवा करणे हे आपलं भाग्य असते. स्वामींचा महिमा खूप मोठा आहे. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स म स्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींच्या या मंत्राचा जप तुमचे सर्व दोष दूर करतो, तुम्ही पवित्र होता व मन प्रसन्न व शुद्ध राहते. यामुळे आपल्या हातातून घडणाऱ्या प्रत्येक कामाला यश मिळते.
असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.