चक्रीवादळ महाराष्ट्राच्या अगदी जवळ, या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी ! जाणून घ्या कुठे आणि कधी जोरदार पाऊस व वारे वाहणार..

नमस्कार मित्रांनो..
चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने चक्रीवादळ महाराष्ट्राच्या अगदी जवळ येवून ठेपल आहे. येत्या काही तासात महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यातून वर्तवण्यात आली आहे. पाहूया सविस्तर माहिती.
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौते हे चक्रीवादळ अधिक सक्रिय झाले असून, गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे सर्वच यत्रंणा सर्तक झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेनं सरकण्यास सुरूवात झाली असून, येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. काल लक्षद्वीप आणि त्याच्या लगतच्या पूर्व अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची परिस्तिथी निर्माण झाली होती. त्याठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते.
आता या कमी दाब्याचे पट्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. येत्या काही तासामध्ये या चक्रीवादळाची तीर्वता आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्या हे चक्रीवादळ कोकणालगत महाराष्ट्राच्या अगदी जवळ येणार असून, येत्या काही तासामध्येच महाराष्ट्रामध्ये अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या चक्रीवादळाचा ताशी वेग काही ठिकाणी 30 ते 40 प्रतितास असून, पण काही तासात या चक्रीवादळाचा वेग वाढून तो 80 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याकडून येत असलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रामध्ये येत्या २४ तासा मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर मराठवाड्यातही तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. अरबी समुद्रात पूर्वमोसमी काळात २०१८ पासून सलग चौथ्या वर्षी अशी चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
हवामानाचा अंदाज घेण्यासाठी १९८० पासून उपग्रहाचा वापर सुरू झाला होता. उपग्रहाद्वारे नोंदी ठेवण्याचा कालखंड सुरू झाल्यापासून पूर्वमोसमी काळात सलग चार वर्षे चक्रीवादळाची निर्मिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
याकाळात शेताला पाणी देणे टाळावे. अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. याच काळात पावसाची पूर्वकल्पना असल्याने वातावरण बघून शेतापासून लांब जावे.
जर आपण शेतात असाल तर उंच झाड, विजेचे खांब, पत्र्याचे शेड, लोखंडी उपकरणे यांपासून लांब राहवे. जनावरांना देखील योग्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. काढनीयोग्य पिक असेल तर आताच दोन दिवसात पिक काढून घ्यावे.
तसेच योग्य ती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी जेणेकरून जास्तीचे नुकसान होणार नाही. हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यामुळे काळजी घेणे हे आपले काम आहे, बाकी सगळे निसर्गावर सोडून द्यावे.
अशीच उपयोगी बातमी आणि लेख वाचण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा.