2 मार्च: अंगारकी संकष्टी, श्री गणेशास अर्पण करा ही 1 वस्तू..घरात श्रीमंती येईल..सर्व दुख, सं क ट हरून समृद्धी येते..

नमस्कार मित्रांनो..

पोर्णिमे नंतर येणारी चतुर्थी ही संकष्टी म्हणून ओळखली जाते आणि मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही अंगाकरकी संकष्टी असते. यावेळी 2 मार्चला अंगारकी संकष्टी येत आहे.  या दिवशी आपण श्री गणेशाची पूजा करून त्यांना प्रसन्न करू शकता. मित्रांनो भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती हे प्रथम पूजनीय मानले गेले आहेत.

कोणतेही शुभ कार्य असो ते कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. तसेच चतुर्थीचा उपवास सुरु करण्यास इच्छुक भक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून उपवास धरू शकतात. या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी.

दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. संध्याकाळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने लाल वस्त्र घालावे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने वर्षभर गणपती बाप्पाचा आशिर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घायचे आहे.

चौरंगावर श्री गणेशाची स्थापना करायची आहे. श्री गणेशाला प्रिय असलेल्या जास्वंदीची फुलं, लाल फुलं व दुर्वा अर्पण कराव्यात.  त्यानंतर श्री गणेश अथर्व शीर्षकाच वाचन करावं. आणि श्री गणेशला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

मित्रांनो जर तुमच्या एखाद्या कामात अडचण येत असेल, तुमचे एखादे काम पूर्ण होत नसेल ते करताना अनेक अडथळे निर्माण होत असतील. तर यासाठी या दिवशी श्री गणेशा समोर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे.

आणि आपले कार्य पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाना प्रार्थना करायची आहे. मित्रांनो गणपतीच्या आशिर्वादाने आपली सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. मित्रांनो तुम्हीसुध्दा या गणेश जयंतीला श्री गणेशाची मनोभावे आराधना करा.

या दिवशी गणपतीला २१ मोदकांचा नैवद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर गणेश स्त्रोत्र म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. मित्रांनो या दिवशी मोदक, दुर्वा, जास्वंदाचे फुल यापैकी कोणतीही एक गोष्ट श्री गणेशास अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात.

म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुले व त्यांची आवडते पदार्थ अर्पण करा. श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घ्या ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश होईल आणि तुमच्यावर गणपती बाप्पाची कृपा कायमस्वरूपी राहील.

आपला देखील गणपती बाप्पांवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “गणपती बाप्पा मोरया” नक्की लिहा आणि ही माहिती आपल्या प्रियजणांसोबत शेयर करा..

अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *