2 मार्च: सगळ्यात मोठी अंगारक चतुर्थी, गणपतीला दाखवा हा नैवद्य..आपले सर्व विघ्न दूर होवून घरात खूप पैसा येईल..

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ..
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण जर विघ्नहर्ता शीर गणेशाला प्रसन्न केले तर आपले सर्व विघ्न लवकरात लवकर दूर होतात आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. आपल्या पैकी सगळ्यांनाच गणपती बाप्पावर श्रद्धा आणि विश्वास आहे.
तर मित्रांनो 2 मार्चला गणपतीची सर्वात मोठी चतुर्थी आहे. ही चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. ही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते म्हणून यास मंगळी चतुर्थी असे देखील म्हणतात. तसेच मंगळवारचा दिवस श्री गणेशाचा दिवस मानला जातो.
या दिवशी भरपूर लोक उपवास करतात, मंत्रजप करतात, वेगवेगळे उपाय करतात जेणेकरून श्री गणेश प्रसन्न होतील. तर या दिवशी तुम्हाला घरात एक नैवद्य करायचा आहे. हा नैवद्य करून तुम्हाला घरात गणपतीला दाखवयाचा आहे.
या नैवद्याने तुमच्या घरातील सर्व विघ्न दूर होतील. घरात खूप पैसा येईल, घरात सुख समृद्धी नांदेल, आनंद, शांतता आणि समधान मिळेल. घरातून नकारत्मकता, वाईट शक्ती, चीडचीडपणा कायमचे दूर होतील. हा नैवद्य म्हणजेच गणपतीची आवडती वस्तू.
गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदकांचा नैवद्य तुम्हाला करायचा आहे. बरेचसे लोक आपल्या घरात मोदकाचा नैवद्य करतात पण हा वेगळा मोदकांचा नैवद्य आहे. यामध्ये आपणास २१ मोदकांचा नैवद्य करायचा आहे.
परंतु तुम्हाला मोदक करताना एक मोदक मिठाचा करायचा आहे म्हणजे खारा मोदक करायचा आहे. बरेचसे लोक उकडीचे मोदक करतात. मोदक तुम्ही कोणतेही करा पण मोदक करताना जेव्हाही तुम्ही कोणतेही सार भराल मग ते खोबऱ्याचे सार असुद्या किंवा पुरणाचे सार असुद्या तर 21 मोदकांमध्ये तुम्हाला 20 मोदक हे गोड आपले नेहमीचे करायचे आहेत.
पण 1 मोदक तुम्हाला मिठाचा भरायचा आहे. आणि हे सर्व मोदक एका ताटात घेवून देवघरात संध्याकाळी तुम्हाला हा नैवद्य दाखवयाचा आहे. यानंतर आपण आरती मंत्रजप करायचा आहे. त्यानंतर सगळ्यांनी तो मोदकाचा प्रसाद खायला घ्यायचा आहे.
प्रसाद म्हणून तुम्ही आता खाऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या खाऱ्या मिठाच्या मोदकाचे काय करायचे. जेव्हा तुम्ही मोदकाचा प्रसाद वाटाल तेव्हा तुम्हाला माहिती नसेल कोणता मोदक खारा आहे. पण तुम्ही हा सर्व प्रसाद वाटायचा आहे.
ज्याच्या नशिबात असेल त्याला तो खारा मोदक मिळेल आणि ज्याला तो खारा मोदक मिळाला तर त्याला वाटेल हा तर खारा आहे. त्या व्यक्तीने तो पूर्ण संपूर्ण मोदक खायचा नाही तर बाजूला काढून ठेवायचा आहे. आपण घराबाहेर तो ठेवू शकता किंवा पक्षांना देवू शकता.
पण ज्याला येईल ही नशिबाची गोष्ट असते, तो गणपतीचा आशीर्वाद असतो. तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात नक्की करून पहा आपल्याला नक्की याचा लाभ होईल.
अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.