मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
26,27 फेब्रुवारी मोठी माघ पोर्णिमा, लक्ष्मी समोर ठेवा यापैकी कोणतीही एक वस्तू घरात श्रीमंती येईल..घरात समृद्धी येवून यश मिळते..

नमस्कार मित्रांनो..

श्री स्वामी समर्थ, मित्रांनो 26 आणि 27 फेब्रुवारीला माघ पोर्णिमा आहे. माघ महिना हा अंत्यत पवित्र महिना असतो आणि माघ महिन्यात येणारी एकादशी असुद्या किंवा पोर्णिमा असुद्या ती माघ एकादशी किंवा माघ पोर्णिमा म्हणून ओळखली जाते.

तसेच 27 फेब्रुवारीला शनिवारच्या दिवशी माघ पोर्णिमा आहे. ही सगळ्यात मोठी पोर्णिमा मानली जाते. या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णू देवाचे आगमन होते असे मानले जाते. त्यांचीच या दिवशी पूजा केली जाते.

तर मित्रांनो या दिवशी या माघ पोर्णिमेवेळी तुम्ही सुद्धा लक्ष्मी मातेसमोर ठेवा यामधून कोणतीही एक वस्तू यामुळे तुमच्या घरात श्रीमंती येईल, बरकत होईल आणि जे हवं ते सगळ काही तुम्हाला मिळू लागेल.

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी देवीच्या आवडत्या वस्तू आपल्याला या दिवशी लक्ष्मी समोर ठेवायच्या असतात. पण सगळ्या वस्तू सगळ्यांनाच जमतील असे नाही. तर त्यामधून एक वस्तू लक्ष्मी मातेसमोर ठेवू शकता जेणेकरून लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर होईल.

तर आता या वस्तू कोणत्या आहेत, तर अशा चार वस्तू आहेत ज्या लक्ष्मीला अंत्यत प्रिय आहेत. तर यातील पहिली वस्तू म्हणजे कवडी. सफेद पांढऱ्या रंगाची कवडी तसे तर पिवळ्या रंगाची कवडी देखील मिळते. पण कवडी आवश्यक आहे.

कवडी तुम्ही लक्ष्मी मातेसमोर ठेवायची असते. तसेच या सोबत कमळाचे फुल सुद्धा मातेला खूप प्रिय असते. असे कमळाचे फुल सुद्धा आपण लक्ष्मी समोर ठेवू शकता.

किंवा हळद, जी अख्खी हळद असते म्हणजे पावडर नाही तर अख्खी हळद जी पूजा सामग्री मध्ये आपण वापरत असतो ती हळद आपण देवी समोर ठेवावी किंवा श्री यंत्र.

आता या चार वस्तू आहेत कवडी, कमळाचे फुल, हळद किंवा श्री यंत्र. यातून कोणतीही एक वस्तू तुम्हाला 26 आणि 27 फेब्रुवारी माघ पोर्णिमेच्या दिवशी आणायची आहे आणि लक्ष्मी मातेसमोर ठेवायची आहे.

हळदी कुंकू, अक्षद आणि फुले वाहून त्या वस्तूची आणि देवी लक्ष्मीची आपणास पूजा करायची आहे. यामुळे तुमच्या घरात श्रीमंती येवू लागेल. गरिबी कायमची दूर होईल. तर नक्की यातून कोणतीही एक वस्तू तुम्ही देवी लक्ष्मी समोर अवश्य ठेवा.

अशाच उपयोगी धार्मिक  माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थांवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.