नमस्कार मित्रांनो..
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ केला असता, यज्ञातून अ ग्नी देव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा ज न्म झाला होता.
त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस हनुमानजयंती म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये अंजनीच्या पोटी हनुमान ज न्म ला. ज-न्म झाल्यावर उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली.
त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फे क ले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा ज न्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. हनुमान जयंती या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १०० पटीने अधिक कार्यरत असते.
या दिवशी श्री हनुमते नम: हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. हनुमंताचे पूजन मंगळवारी केल्याने भरपूर लाभ होतो तसेच जर मंगळवारी हनुमान जयंती आली तर आणखीनच फायदा होतो.
आणि जर पौर्णिमेला हनुमान जयंती व मंगळवार हा अतिशय दुर्मिळ योग आला आहे त्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळू शकतो जर तुम्ही हनुमान पूजन असे केले व चमत्कारिक उपाय केले तर तुमचं आयुष्य सुखी, समृद्ध होईल. या दिवशी तुमच्या घरीच देवपूजा झाल्यावर श्री राम मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी.
हनुमानाची प्रतिमा अथवा मूर्ती पूजा करू शकता. मारुतीला प्रिय असणारे शेंदूर लावा. तसेच ओम हनुमते नमः जय श्री राम असा जप करा. असा जप केल्यास भगवान श्री राम व मारुतीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. या दिवशी एक कोरा कागद घ्या व त्यावरती लाल रंगाचा पेनाने श्री राम असे मोठ्या अक्षरात लिहा.
तो कागद देव्हाऱ्यात ठेऊन त्यावरती कुंकू, हळद, अक्षता वहा, फुले वहा श्री रामाचा जप करा. मारुतीचे स्मरण करा. त्यानंतर तो कागद तुमच्या तिजोरीत ठेवा, जिथे पैसे ठेवता तिथे हा कागद ठेवल्यास तुमची भरभराट होते. व्यवसाय उभारी घेतो, घरात पैसे येण्याचे अनेक मार्ग मिळतात.
त्यामुळे एक सुखी, समाधानी जीवन जगाल. हनुमान मारुती तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा उपाय करत असताना तुमच्या मनात श्रद्धा, विश्वास, प्रेम ठेवा. मनापासून उपासना केली तर फळ नक्की मिळते. तर या हनुमान जयंतीला हा उपाय नक्की करून पहा.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.