नमस्कार मित्रांनो..
होळीचा सण म्हणजे पवित्र अग्निदेवतेला नमन करायचा दिवस आहे. यावर्षी 28 मार्च रोजी होळी आहे त्यादिवशी होळीच्या पवित्र अग्नीला प्रदक्षिणा घालून आपल्या इच्छा देवाला सांगायच्या असतात. त्यामुळे घरातील कलह, तुमच्या आयुष्यातील दुःख नाहीसे होते.
घरात भरभराट हवी असेल, वाद, कलह मिटवायचे असतील तर होळीची तिथी ही अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी दहन केल्या जाणाऱ्या गोष्टी आपला त्रास कमी करतात त्यामुळे होलिकादहन विशेष मानले जाते.
हिंदू पंचांगात या दिवसाचे विशेष महत्व यासाठी आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रा स, दुःख, दोष दूर होतात, पवित्र अग्निदेवतेला नमस्कार, प्रदक्षिणा घालून कोणतीही इच्छा तुम्ही मागू शकता व काही छोटे व परिणामकारक उपाय तुम्ही करू शकता. होळीच्या दिवशी पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश ही पंचमहाभूते अतिशय सक्रिय असतात त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्व आहे.
होळीच्या दिवसाचे अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे. या दिवशी केले जाणारे कोणतेही कार्य सफल होते. नोकरीत प्रमोशन, अडचण व्यवसायात होणारी अधोगती जर तुम्हाला नष्ट करायची असेल तर तुम्ही होळीच्या आधल्या दिवशी हा उपाय नक्की करा. त्यासाठी एक मोठा तुरटीचा खडा बाजारातून आणायचा आहे. त्या तुरटीचे एकूण सहा भाग करायचे आहेत.
हे सहा भाग एकाच हातात घेऊन घरातून सर्वत्र ठिकाणांहून फिरवायचे आहेत त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींच्या अगदी बालकापासून ते वयोवृद्धपर्यंत जशी नजर काढतो तशा पद्धतीने फिरवा आणि ते एका काचेच्या बरणीत ठेवा.
रात्रभर ते तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजेच होळी दिवशी तुम्हाला सव्वा किलो कोणतेही धान्य जसे की ज्वारी, बाजरी, गहू, नाचणं यापैकी कोणतेही एक धान्य सव्वा किलो घेऊन व सोबत सात कापराच्या वड्या आणि ते तुरटीचे सहा तुकडे घेऊन होळीकडे जायचे आहे.
होळीला नमस्कार करून हे साहित्य होळीत अर्पण करायचे आहे. त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तसेच अलक्ष्मी घरातून निघून जाते. घरातील दुःख, दारिद्रय नाहीसे होऊन लक्ष्मी घरात प्रवेश करते, तसेच घरातील, नोकरीतील, व्यवसायात प्रगती होते, सर्व अडचणी दूर होतात व भरभराट होते.
हा उपाय करत असताना अतिशय सावधपणे, काळजीपुर्वक करायचा आहे. तसेच हा उपाय तुमच्या उन्नतीसाठी करायचा आहे, घरच्या सुखासाठी करा इतर कोणत्याही भावनेने, दुसऱ्यांच्या साठी केल्यास त्याचे परिणाम विचित्र होतील. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.