28 मार्च: होळीला हे उपाय करा, वर्षभर मिळत राहील धनलाभ..घरावर येणारे संकट परतवाल..

नमस्कार मित्रांनो..
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचा उत्सव साजरा केला जातो. होळीला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी याला विभिन्न नावांनी सं बो ध ले जाते. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, पुरण पोळीचा गोड नैवेद्य, होळी पेटवणे, होळीची वाद्य जी छोटी मुले वाजवत असतात या सर्वांनी वातावरण अगदी गजबजून जाते.
यावर्षी हा उत्सव २८ मार्च २०२१ रोजी आला आहे. हिंदू पुराणात होळीच्या अनेक कथा सांगितल्या आहेत ज्यामध्ये होळीचे महत्व, आ रोग्यदायी फा यदे सांगितले गेले आहेत. त्यामुळे होळीला फार महत्व आहे. असे म्हणतात की होळीच्या आगीत त्या अग्निदेवतेला आपला त्रा स, दुःख, सं कटे अर्पण करायची आणि त्यामुळे आपल्या मागची पिडा, त्रा स कमी होतो.
होळी पे-टवल्यानंतर घरातील व्यक्तीने गाईचे शुद्ध तूप, अकरा लवंगा, अकरा बत्ताशे, एक गोटा खोबऱ्याचे नारळ, सात विड्याची पाने व पुरणपोळी, वरणभात घेऊन होळीची मनोभावे पूजा करावी, पूजा झाल्यावर अकरा प्रदक्षिणा घालाव्यात तसेच ते झाल्यावर नैवेद्य दाखवावा.
खोबऱ्याचा नारळ होळीत अर्पण करावा. मनोभावे प्रार्थना करावी. होळीच्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन एका काळ्या कपड्यात बांधून दिवसभर खिशात ठेवावे व रात्री होळीमध्ये अर्पण करावे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सं क ट नाहीसे होते, घरात सुख शांती येते.
सात गोमटी चक्रे हातात घेऊन शत्रूच्या पी-डिपासून सं र क्ष न कर, शत्रूंचा नाश होउदे अशी प्रार्थना करून ती चक्रे होळीत अर्पण करा व नमस्कार करा. होळीच्या दुसऱ्या दिवशी ती राख घरी आणून त्यात थोडी राई आणि मीठ मिक्स करून घरी बांधून ठेवावे त्यामुळे अशुभ शक्ती घरात वास करत नाही आपले रक्षण होते.
होळी दिवशी महादेवाला २१ गोमती चक्रे अर्पण करावीत त्यामुळे आपल्या नोकरीत व व्यवसायात प्रगती होते. होळीच्या दिवशी सर्व देवी देवतांची पूजा करावी आणि आपल्या प्रगतीची प्रार्थना करावी. तसेच या दिवशी चार मुखी दिवा लावावा व गरिबांना पुरणपोळी दान करावी.
होळीमध्ये पुराण पोळी व भरला नारळ अर्पण करावा. तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगाला लावून त्याने स्नान करावे व तीच राख महादेवाला भस्म म्हणून लावावे व घरासाठी प्रार्थना करावी. घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला गुलाल लावावा व दोन मुखी दिवा लावावा त्यात अकरा काळे उडीत घालून घरासाठी, धन धान्यासाठी प्रार्थना करावी.
ही क्रिया मनापासून करावी त्यामुळे धनहानी थांबते व घरात पैसा टिकतो. हा दिवा रात्री होळीच्या अग्नीत दान करावा. तिथेही आपली पिडा व दुःख अग्निदेवतेला सांगावे त्यामुळे आपली धन संपदा वाढते.
वारंवार घरात दु र्घ ट ना, अपघात घडत असतील तर होळीच्या दिवशी एक नारळ व पाच लाल गुं-ज्या घेऊन अकरा प्रदक्षिणा होळीला घालाव्यात त्यानंतर तो नारळ आणि गुंजा होळीकडे पाठ करून डोक्यापासून नखापर्यंत उतरून होळीत अर्पण करावेत. त्यामुळे आपल्या आयुष्यातील गोष्टी पूर्ववत होतील व घटना पुन्हा घडणार नाहीत.
विवाह जमत नसतील किंवा विवाह लांबनीवर पडत असेल, अडचणी येत असतील तर त्यासाठी होळीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो, या दिवशी सकाळी दोन विड्याची पाने, सुपारी व हळकुंड घेऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला अर्पण करावेत, आणि प्रार्थना करावी हा उपाय दररोज रंगपंचमी पर्यंत न चुकता करावा त्यामुळे तुमचे विवाह जुळण्यात मदत होईल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सुखी जीवनासाठी होळीच्या पवित्र दिवशी प्रार्थना करू शकता. त्यामुळे तुमचे जीवन नक्कीच सुखी होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.