नमस्कार मित्रांनो..
आपल्या लाडक्या बाप्पांची सेवा करायला सर्वांनाचं आवडतं, तसेच सर्वांचा भरपूर उत्साह देखील असतो. गणपती म्हणजे आराध्यदैवत, गणेश म्हणजे शुभ कामाची सुरुवात आणि गणपती म्हणजे संकटातून तरुण नेणारा असा बाप्पा. गणपती बाप्पा म्हणजे सर्वप्रथम ज्यांची पूजा केली जाते, कामाची सुरुवात ज्या देवतेला वंदन करून केली जाते.
अशा लाडक्या बाप्पांची सेवा आपण गणेश चतुर्थी ला करतोच, परंतु महिन्याला जी संकष्टी येते ती सुद्धा बरेच लोक करतात, यादिवशी उपवास करून सायंकाळी नंतर चंद्रोदय झाल्यावर सोडतात तेही पूजा, आरती, चंद्रदर्शन करून. यावेळी एप्रिल महिन्यात ही संकष्टी 30 एप्रिल रोजी आली आहे.
पंचांगानुसार ही एक विशेष संकष्टी तिथी आली आहे, यादिवशी स्वतःच्या प्रगतीसाठी, धनलाभाशी निगडित उपाय केले तर ते फलप्रद होतील. 30 एप्रिल संकष्टी दिवशी तुम्ही हा उपाय करा, ज्याने तुम्हाला आलेल्या सं-कटांना सामोर जाण्यासाठी बळ येईल, तसेच तुमच्या अडचणी स्वतः बाप्पा दूर करतील, तुमच्या प्रयत्नांना यश देतील.
यादिवशी तुम्हाला फक्त 11 रुपयांची गरज आहे, हा उपाय म्हणजे या दिवशी हे 11 रुपये या ठिकाणी ठेवायचे आहेत. संकष्टी दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून प्रथम हा उपाय करा. अंघोळ केल्यानंतर तुम्ही देवपूजा करून प्रसन्न मनाने गणेशपूजा करून घ्या.
पूजा झाल्यानंतर हे 11 रुपये तुम्ही तुमच्या देवघरात मनात कोणतीही शंका, अश्रद्धा न ठेवता स्वच्छ भावनेने देव्हाऱ्यात कोणत्याही डाव्या उजव्या दिशेस ठेवून त्यावर हळदी कुंकू अक्षता वहा आणि पुष्प अर्पण करून धूप आणि आरती करा व तुमच्या सुखासाठी, धनलाभ होण्यासाठी, अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा. ते 11 रुपये त्या दिवशी देव्हाऱ्यातच ठेवा.
संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे 11 रुपये तुमच्या घराजवळील गरजू, गरीब व्यक्तीला दान करा. जर दान करणे लगेच शक्य नसेल तर वेळ मिळेल तेव्हा दान करा अथवा कोणत्याही मंदिरात दान पेटीत टाका. असग प्रकारे या विशेष संकष्टी दिवशी हा उपाय केल्यास लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल, तुमच्या अडचणी, संकटे दूर होतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.