नमस्कार मित्रांनो..
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीस श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस असतो. याच दिवशी महाराजांनी अवतार धारण केला होता. तर 5 मार्च शुक्रवारच्या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उस्ताहाने साजरा केला जात आहे.
गजानन महाराजांच्या कृपेने मोठी मोठी सं क टे दूर होतात. कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असतील म्हणजे आजारी असणे तर अशा आजारापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक लोक श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी काही मंत्राचा जप करताना दिसतात.
आजच्या या धावपळीच्या जीवनात पारयणासाठी सर्वाना तितकासा वेळ मिळत नाही. मित्रांनो श्री गजानन महाराजांचे पारायण हे एका बैठकीत व्हावे लागते. संपूर्ण पोतीचे वाचन करण्यास पाच ते सहा तास लागतात. मात्र सर्वच भक्तांना या गोष्टी करणे शक्य होत नाही.
म्हणूनच श्री गजानन महाराजांचा अंत्यत प्रभावी मंत्र आहे. की या मंत्राचा जप करण्याने आपल्या जीवनातील सर्व दुख दूर होतील, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील असा हा मंत्र आपण आज रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा.
अंत्यत प्रभावशाली आणि बोली भाषेतील हा मंत्र आहे. मात्र कोणत्याही मंत्राचा जप करण्यापूर्वी आपण या मंत्राचा का जप करत आहोत, त्यापाठीमागची भावना काय आहे हे आपण श्री गजानन महाराजांना नक्की सांगावे. जर आपल्या जीवनात पैशाची समस्या असेल, धन नसेल, गरिबी असेल तर अशा वेळी गजानन महाराजांच्या फोटो समोर न त म स्त क होवून आपली जी इच्छा आहे ती सांगावे.
त्यानंतर या प्रभावी मंत्राचा जप करण्यास सुरवात करावी. आपण हा जप फक्त एक माळ केली तरी चालेल. जर माळच नसेल तर घरामध्ये धान्याचे दाने असतात हे १०८ मोजून घ्या अगदी यावर सुद्धा हा मंत्र म्हणल्यावर एक एक दाना बाजूला काढा.
अशाप्रकारे सुद्धा साध्या पद्धतीने आपण गजानन महाराजांची उपासना करू शकता. मित्रांनो हा जो गजानन महाराजांचा मंत्र आहे तो म्हणजे गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते या मंत्राचा किमान एक माळ जप आपण झोपण्यापूर्वी अवश्य करा.
मात्र जप करण्यापूर्वी आपली इच्छा गजानन महाराजांसमोर नक्की मांडा. गजानन महाराजांच्या कृपेने आपले जीवन समृद्ध होवो.. धन्यवाद
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.