7 मे 2021 वरूथिनी एकादशी: आज नक्की करा हे 1 काम 7 पिढ्या पैशांवर राज करतील..सर्व काही मिळेल

नमस्कार मित्रांनो..
पांडुरंग हरी, वासुदेव हरी, खरंच पांडुरंगाचे नाव घेणे म्हणजे सुखंच होय, नुसते सुख नव्हे तर समाधानाची पावती सुद्धा मिळते. त्यामुळे तुमच्या घरातील सुख, समृद्धी, सकारात्मक बुद्धी, समाधान हरवलं असेल तर पांडुरंगाचे स्मरण, पूजन, भजन करत रहा, सर्व चिंता, अडचणी तो सखा पांडुरंग दूर करेल.
याच पांडुरंगाची उपासना केली जाते ती म्हणजे एकादशी चा उपवास करून, या दिवसाला खूप पवित्र मानले जाते, अनेक भक्त यादिवशी उपास करतात. एका वर्षात 24 एकादशी येतात, या एकादशी म्हणजे साक्षात पांडुरंग भेटीचा आनंद देतात, त्याचा आभास होतो.
कृष्ण व शुक्ल पक्षात अशा दोन एकादशी येतात. या प्रत्येक एकादशीचे तिचे तिचे स्वतंत्र महत्व असते, त्यामुळे त्या त्या एकादशीला वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. मे महिन्यात 7 मे रोजी वरूथिनी एकादशी आली आहे. या वरूथिनी एकादशीला केलेलं व्रत, उपवास मोक्षदायी ठरते. आपला अपमृत्यू टळतो, तसेच मोक्ष मिळतो.
चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरूथिनी एकादशी म्हणतात. ही मराठी महिन्यातील पहिलीच एकादशी आहे, अतिशय शुद्ध भक्तिभावाने ही एकादशी केली जाते. वरूथिन या शब्दापासून या नामाची उत्पत्ती झाली, ज्याचा अर्थ आहे, रक्षा कवच, म्हणजेच ही एकादशी करण्याऱ्या भक्तास भगवान पांडुरंग स्वतः त्याची रक्षा करतात.
म्हणूनच या एकादशीचे एक अनोखे महत्व आहे. भगवान श्रीहरि विष्णू अशा भक्तास स्वतः आशीर्वाद देतात, त्याची रक्षा करतात व म्हणून उपवास तसेच विष्णू सहस्त्रणामावली यादिवशी करायला विसरू नका, ते जमत नसेल तर श्रवण तर नक्कीच करा. या व्रताचा संकल्प करा, श्रीहरी पांडुरंगाचे पूजन करा व संपूर्ण दिवस नाम स्मरण करत रहा. आणि फलाहार घेत रहा.
यामुळे तुमच्या आयुष्यातील शांती करत येईल व मन शांत होईल. या वरूथिनी एकादशीचे व्रत करणे म्हणजे 10,000 वर्षे तप करण्यासमान आहे. राजा मंदाथा हे व्रत करूनच मोक्ष प्राप्त केले होते व स्वर्गलोकी प्रस्थान झाले होते. या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.
ही एकादशी आपल्याला भयमुक्त करते, यमाचे भय राहत नाही, येते ती फक्त शांती आणि भक्ती. वरूथिनी एकादशीचे महत्व इतके आहे की याचं फळ हे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण वेळी 1 मन सुवर्ण दान केल्यानं जितकं पुण्य मिळते तितके मिळते. भगवान श्री कृष्णाने याचा प्रथम उपदेश युधिष्ठीराला केला होता. तसेच या दिवशी उपवास, व्रत, श्रीहरी विष्णूंची वराह अवताराची पूजा केली जाते. याला खूपच महत्व आहे. म्हणून या व्रताचे महत्व नेहमी लक्षात घ्या.
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी..
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.