मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
7 वर्षांनी शेजारच्या काकूंच्या घरी येणारी त्यांची भाची अचानक पुण्यात भेटली अन पुढे जे घडले..

नमस्कार मित्रानो  त्यावर्षी मी दहावीच्या वर्गात गेलो होतो आणि ती आठवीत होती आमच्या घरा शेजारच्या काकूची भाची दर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्याकडे सुट्टीला येत असे आणि त्या वेळी दुपारी पत्ते, कॅरम ,गाण्याच्या भेंड्या या सारख्या खेळात आम्ही सुट्टीचा आनंद लुटत असे. आम्ही पत्ते खेळताना एकमेकां शेजारी बसायचो त्यामुळे ते पत्ते वाटताना ,उचलताना आमचा एकमेकांच्या हाताला स्पर्श व्हायचा.

नुकत्याच घडून आलेल्या तारुण्यसुलभ भावना आणखी फुलत होत्या. आम्ही दोघेही एका वेगळ्या स्व प्नाच्या विश्वात रमून जात. तसेच कॅरम मध्ये आम्ही एकमेकाचे जोडीदार असायचो, त्यामुळे या खेळाचे काय गेम प्लॅन, तसेच राणी कशी घ्यायची वगैरे सगळं एकमेकांना डोळ्यांचे इशारे करून सांगत असत, तेव्हा दोघांनाही कळले की आपले दोघांचे स्वप्न किंवा ध्येय एकच आहेत.

एके दिवशी पु लं देशपांडे यांचे अपूर्वाई ती घेऊन गेली आणि मला बोलली की चार दिवसात परत करते आणि माझ्याकडे व.पु. आहेत तुला पाहिजेत का असा प्रश्न तिने विचारला ? मी म्हणालो मला हवय ते पुस्तक, ते पुस्तक देताना आणि परत तो हवाहवासा स्पर्श आमचा एकमेकांना झाला.

परत एकदा मन रोमांचित झालं आणि रात्री काय स्वप्न पडणार हे तिच्या डोळ्यांनी मला हळूच सांगितलं मी तिला म्हणालो मी तुझं पुस्तक बघून उद्या देतो त्यावर ती बोलली उद्या नक्की दे प्लीज मी उद्या संध्याकाळी परत जाणार आहे.

ती उद्या पुन्हा आपल्या घरी येणार या भावनेने माझ्या डोळ्यातून आनंद उत्साह वाहत होता पण तसेच उद्या ती परत आपल्या गावी जाणार त्या गोष्टीची खंतही खुप वाटत होती. ती तिन्ही’सांज स्वप्न बघण्यातच गेली. पण तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी मला काहीतरी सांगितलं असं माझ्या मनाला वाटत होते.

अपूर्वाइ उघडून बघताच त्यामध्ये एक पिंपळाचे पान आणि त्याच्या भोवती चार गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या तिने पाहिल्या. दुसऱ्या दिवशी तिने मला दिलेल्या व.पूं. यांच्या पुस्तकात मी माझ्या कडील एक मोरपीस लपवले आणि काकूंच्या घरी जाऊन ते पुस्तक कोणाला देऊ नको फक्त तूच आधी बघ असं तिला सांगितलं.

कालांतराने आज सात वर्षांनी ती मला योगा योगाने भेटली तेव्हा माझे CA सुरू होते आणि ती इंजि निअरिं गला होती. आज खूप वर्षांनी मी तिला पाहिलं तरी डोळ्यां मधली ती स्वप्नं आणि चमक तशीच होती. मी विचार केला की जरी पुस्तकांच्या पानात गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध असला तरी पिंपळ पानाच्या फक्त मधल्या देखा तरी दिसतायेत ज्यामध्ये आपल्या भेटीचा अर्थ लपला होता.

आमच्या गप्पा सुरु झाल्या, तिच्या मनात काही नसेल आता. असे मला वाटले, पूर्वीच्या आठवणी आणि ते दिवस कधी आठवण करेल ती! तुझ्या त्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत माझ्या मनावर, ते पत्ते, कॅरम खुप मिस करतो मी असे मी तिला म्हणालो. तसेच मी तिला म्हणालो की मला कधीकधी वाटतं की उगाच मोठे झालो.

दोघेही मनमुराद हसत असताना तिने हातावर टाळी दिली तो स्पर्श अजूनही तसाच होता. हवाहवासा वाटणारा. काही काळ गप्पा झाल्यानंतर तिने मला विचारले की तुला ग’र्लफ्रेंड आहे का ?

त्यावर मी लगेच सांगितले अजूनही सिंगल आहे मी! हसलो आणि माझ्या लक्षात आलं की तिच्या डोळ्यांत चमक अजून वाढली आहे. मग मी तिला विचारले की तुझा कुणी प्रियकर आहे का ?

ती हलकेच हसली आणि म्हणाली, नाही. इतकेच नाही ती म्हणाली अजून जपून ठेवले आणि रोज रात्री झोपताना ते मोरपीस मी उशीखाली ठेवते. यानंतर आम्ही एकमेकांना प्रपोज केले..अशी होती आमची सुखद प्रेम कथा..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.