9 मे रविवार: स्वामींची पुण्यतिथि स्वामींना कसे प्रसन्न करावे? कोणती सेवा करावी जाणून घ्या..यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल..

श्री स्वामी समर्थ
मित्रांनो भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्र भरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात.
पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. यंदा 9 मे या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे.
दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त नामजपासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदा को-रोना व्हा य र स सं-कटामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स-मस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
सकाळी लवकर उठून स्नान आवरून प्रसन्न मुद्रेने, मनात स्वामींची मूर्ती ठेवून, शुद्ध भक्ती भावाने , पूर्ण श्रद्धेने निष्ठेने घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्याची पूजा करा, स्वामींच्या सेवेच्या पुस्तकातील सर्व नियमांचे पालन करा. स्वामींची व्यवस्थित पूजा करून फुले, गंध, हार घाला.
यानंतर स्वामींची मूर्ती मनात ध्यान करून जप करायचा आहे. तुम्हाला सकाळी, दुपारी, सायंकाळी कधी जमेल तेंव्हा एकाच वेळी एकाच जागी बसून स्वामींचा महामंत्र 11 माळ जप करण्याचा आहे. हा मंत्र एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून शांत चित्तेने, एकाग्रतेने करायचा आहे ज्यामुळे तुम्ही स्वामी चिंतनात तल्लीन व्हाल.
असे केल्यास स्वामी तुमच्यावर प्रसन्न राहतील. स्वामींचा आशीर्वाद सदैव राहील. स्वामींचा महामंत्र असा आहे. श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा सातत्याने जप करा, 11 माळ सलग जप करा, तुमची अडचण दूर होईल, सं-कट निघून जाईल, घरात सुख येईल, तुमचे काम होईल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.