31 मार्च बुधवार: संकष्टी दिवशी हे उपाय केल्याने घरात येईल धनाचा पाऊस..गणपती बाप्पा करतील सर्व दुख, अडचण दूर..

नमस्कार मित्रांनो..
आपल्या घरात काही गोष्टी विपरीत घडतात, पैसा येण्याचे मार्ग बंद होतात, जरी पैसा आला तरी तो टिकत नाही त्यामुळे नेहमी गरिबी, दारिद्र्य आपल्या घरी राहते. घरातील धनाचा नाश होतो, घरातील गोष्टी नकारात्मक होतात. अलक्ष्मी घरात प्रवेश करते. पण निराश न होता बुधवारी हे उपाय करून पहा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणी कमी होतील व पैसे येण्याचे मार्ग रिकामे होतील. त्यामुळे तुम्ही हे काही छोटे उपाय नक्की करून बघा.
बुधवार हा वार श्री गणेशाचा मानला जातो तसेच उद्या संकष्टी देखील आली आहे, या दिवशी भगवान श्री गणेशाची केलेली पूजा फळास येते. आपण घरी आपल्या लाडक्या गणेशाची आराधना, प्रार्थना करू शकता. गणेशाची पूजा सर्व देवांच्या आधी करतात त्यामुळे त्याना मंगलमूर्ती म्हणतात. सर्वांचे आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा आहेत. त्यांची मनोभावे पूजा केली तर ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात, गणपतीला संकट नाशक असेही म्हणले जाते.
तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा खूप झाली असेल , प्रत्येक गोष्टीमध्ये जर अपयश येत असेल तर तुम्ही बुधवारी गणेशाची पांढऱ्या रंगाची मूर्ती घरी आणून स्थापन करा व मनोभावे नियमितपणे त्याची पूजा करा, असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल, तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील.
कष्ट कितीही केले तरी मोबदला मात्र काहीच हाती लागत नसेल किंवा पैसे मिळत नसतील तर बुधवारच्या दिवशी तुम्ही गणेशाची यथाविधी पूजा करून त्याचे दर्शन घेऊन गणेशाला गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्द नंतर गाईला चारा. असे केल्याने तुमच्या कष्टाचे चीज होईल व योग्य मोबदला तुम्हाला मिळेल. तुमच्या घरी धन येईल व तुम्ही श्रीमंत बनाल.
घरात कलश जर वाढत असेल, खूप वाद होऊन कटकट होत असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा. घरातील कलह हा उपाय कमी करतो किंवा नाहीस करतो. बुधवारी श्री गणेशाची दुर्वांची प्रतिकात्मक मूर्ती बनवून ती आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्थापन करा ,
तिचे यथाविधी पूजन करून दर्शन घ्या असे केल्याने गणेशाचे आशीर्वाद आपल्या घरावर राहतात व त्यामुळे घरात पुन्हा वाद होत नाहीत.
तुमच्या प्रयत्नांमध्ये अडचणी जर खूप येत असतील, यश मिळत नसेल तर बुधवारच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा घाला व त्याला नमस्कार करून तुमची व्यथा सांगा, तसेच त्यानंतर तुम्ही जवळच्या गणेश मंदिरात जाऊन गणेशाला मनापासून प्रार्थना करा आणि तुमच्या अडचणींवर मात करण्याचं बळ देण्याची विनवणी करा.
हत्ती जर उपलब्ध नसेल तर गाईला सुद्धा हिरवा चारा घालून तिचे आशीर्वाद घेतले तरी चालतात. यानंतर थोड्याच दिवसात तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील व यश येईल. बुधवारी सकाळी स्नान करून एक कांस्य थाळीत चंदनाच्या लेपाने ओम गं
गणपतये नमः असे लिहावे.
त्यावरती पाच बुंदीचे लाडू ठेवावेत व ते जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दान करावेत असे केल्याने अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते व तुम्हाला गणपतीचे आशीर्वाद मिळतात. बुधवारी गुळाचे २१ छोटे छोटे गोळे व शुद्ध तूप घेऊन जवळच्या गणेश मंदिरात गणेशाला नैवेद्य दाखवावा व ते प्रसाद म्हणून गरिबांना दान करावेत.
श्री गणेशाला प्रिय असणारे दुर्वा व लाल फुल अर्पण करावे. तसेच बुधवारी गणेशाला प्रिय असणारे बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवून ते गरिबांना द्यावेत. गूळ आणि शुद्ध तूप गणपतीला दाखवून ते गाईला चारावे. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील दोष कमी होतात व अडचणी देखील कमी होतात.
श्री गणेशाची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी. हे सर्व उपाय चमत्कारिक आहेत जर श्रद्धेने तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी केले तर नक्की तुम्हाला त्याचे फळ भेटेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.