14 मे अक्षय तृतीया: घरात येथे काढा हे 1 चिन्ह.. घरात लक्ष्मीचा स्थिर वास राहील, सर्व काही मिळेल

नमस्कार मित्रांनो

अक्षय सुख देते ती अक्षय्य तृतीया होय, साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया होय. ही अक्षय तृतीया यावर्षी 14 मे 2021 रोजी आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दैवी शक्ती सुदधा खूप कार्यरत असतात ज्या यादिवशी धरतीवर उतरतात.

आपल्याला आशीर्वाद मिळतो व आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अडचणी दूर होतात. वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे.

एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय. सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय्य मानली गेली आहे.

त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय्य मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्षे लोटली. मात्र, या अक्षय्य गोष्टी आजही अस्तित्वात असून, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत या गोष्टी कायम असतील, असे सांगितले जाते. यादिवशी माता लक्ष्मी पूजन महत्वपूर्ण मानले जाते त्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धनलाभ होतो.

अक्षय्य तृतीयेचा शुभ तिथी ही 14 मे पहाटे 5 वा. 38 मि. पासून ते 15 मे स. 8 वा. पर्यंत आहे. आणि पूजेचा शुभ मुहूर्त आहे 14 मे स. 5 वा. 38 मि पासून ते दु. 12 वा 38 मि पर्यंत, हा उपाय करताना या वेळेतच करा. या तिथीला उपाय केल्याने सर्व कार्ये मंगल होतात आणि शुभ फळ देतात.

तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही वस्तू दान केल्याने अक्षय्य पुण्य मिळते, आपल्या पितृना शांती मिळते. या दिवशी सकाळी लवकर उठून रांगोळी काढा, मुख्य दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावा. विष्णू व लक्ष्मी नाम जप केल्याने इच्छित फलप्राप्ती होते.

अष्टदल कमळ हे माता लक्ष्मी सोबत श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय आहे. हे अष्टदल कमळ तुम्ही देवपूजा आटोपल्यावर ईशान्य कोपऱ्यात एक पाट ठेवा, त्यावरती लाल वस्त्र अंथरूण त्यावरती हळदीमध्ये गंगाजल मिक्स करून त्याने 2 अष्टदल चिन्ह काढा. डाव्या बाजूला श्रीहरी विष्णूंची मूर्ती ठेवा व उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा.

मध्ये थोडं कुंकू वहा व श्रीहरी विष्णूंना अष्टगंध वाहून त्यानंतर पिवळे फुल जे त्यांना अतिशय प्रिय ते वहा. तसेच माता लक्ष्मीला कुंकू हळदीचा तिलक व लाल रंगाचे फुल अर्पण करा. यानंतर गोड नैवेद्य दाखवून आरती करा, तसेच त्यानंतर नाम जप करा. कमीतकमी 108 वेळेस जप करा. हा प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते. धनाची कमी भासत नाही.

अशा प्रकारे ही अक्षय्य तृतीया तुम्हाला भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *