मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
14 मे: शुक्रवार अक्षय तृतीया, इथे फेका मूठभर तांदूळ..छप्परफाड पैसा येईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल..कशाची कमी पडणार नाही

नमस्कार मित्रांनो

वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे.

अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय. सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय्य मानली गेली आहे. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय्य मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्षे लोटली.

मात्र, या अक्षय्य गोष्टी आजही अस्तित्वात असून, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत या गोष्टी कायम असतील, असे सांगितले जाते. यादिवशी माता लक्ष्मी पूजन महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धनलाभ होतो. अक्षय सुख देते ती अक्षय्य तृतीया होय, साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीय होय.

ही अक्षय तृतीया यावर्षी 14 मे 2021 रोजी आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दैवी शक्ती सुद्धा खूप कार्यरत असतात यादिवशी धरतीवर उतरतात. आपल्याला आशीर्वाद मिळतो व आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अडचणी दूर होतात.

श्रीहरी विष्णू पूजन माता लक्ष्मी सोबत, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा, जे शिवभक्त आहेत त्यांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करा यानंतर, तुम्ही गजेंद्र मोक्ष पाठ अवश्य करा. यादिवशी अक्षय्य पुण्य प्राप्तीचा योग असतो. हा दुर्मिळ योग वर्षातून एकदाच येतो.

त्यामुळे यादिवशी शक्य तितके पुण्यकर्म करत रहा. या दिवशी केलेल्या दानाचे देखील भरपूर महत्व असते. तुमच्या जीवनातील सर्व पिडा नष्ट होतील जर तुम्ही या दिवशी गरिबांना, गरजूंना यथाशक्ती दान केलं तर. या दिवशी अक्षय्य ऊर्जा, खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर वावरत असते, ज्याचा लाभ तुम्ही करून घेऊ शकता.

घरी गोड धोड बनवून देवपूजा करून त्याचा प्रसाद दाखवा व सर्वत्र वाटून खा. तसेच एक मूठभर तांदूळ, 1 रुपयाचे नाणे, एक स्वच्छ पाटावर या दिवशी पूर्वेच्या भिंतीला ठेवा, त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरा व त्यावरती कोणतीही प्लेट ठेऊन त्यात 1 रूपयाचे नाणे ठेवा व तो रुपया झाकला जाईल इतका ढीग तांदूळ त्यावरती त्या प्लेट मध्ये टाका.

त्यानंतर एखादा दिवा घ्या, मातीचा किंवा पिठाचा, त्यामध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घाला व त्या तांदळाच्या ढिगावरती तो दिवा प्रज्वलित करा. हा दिवा विझू देऊ नका, किंवा जरी विझला तरी शंका घेऊ नका. यामुळे घरात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा येते व घरात वातावरण प्रसन्न राहते.

असाच साधा किंवा कणकेचा दिवा बाहेर मुख्य दरवाजात लावा ज्यामुळे घरी नकारात्मक, दुष्ट ऊर्जा प्रवेश करणार नाही. देवाकडे तुम्ही प्रार्थना करा व जप करा. दुसऱ्या दिवशी घरातील तो दिवा बाजूला करून तेथील रुपया व थोडे तांदूळ घेऊन पुरचुंडी करून ती तुमच्या धन साठवण्याच्या ठिकाणी ठेवा.

तसेच घरातील उरलेले तांदूळ तुम्ही घरी जेवणात वापरू शकता किंवा पक्षांना टाकू शकता. तसेच ते 2 कणकेचे दिवे वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने तुमच्या घरात भरपूर धन येईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.